शिव कॉलनीत बंद घर फोडून लाखोंचा मुद्देमाल लंपास !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | १७ ऑक्टोबर २०२३ | जळगाव शहरातील अनेक परिसरात नियमित बंद घर बघून त्यांना मध्यरात्री फोडण्याचा प्रकार सुरु असतांना पुन्हा एकदा शिव कॉलनी परिसरातील बंद घर फोडून घरातून तब्बल १ लाख ११ हजार ६०० रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घडली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील मेहरूण परिसरातील भवानी मंदीराजवळील रहिवासी प्रदीप सुदाम वाणी (वय-३६) त्याचे शिवकॉलनी येथे देखील घर आहे. या घरात त्याने मंडप व स्टेज सााठी लागणारे ॲम्लीफायर, बॅटरी, माईक वायर, मिक्सर असे सामान ठेवण्यात आले होते. २९ सप्टेंबर रोजी अडीच वाजता सर्व सामान घरात ठेवून कुलूप लावलेले होते. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत ॲम्लीफायर, बॅटरी, माईक वायर, मिक्सरअसा एकुण १ लाख ११ हजार ६०० रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार रविवार १५ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता उघडकीला आला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर प्रदीप वाणी यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सोमवारी १६ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील करीत आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS