साक्षीदार | २० ऑक्टोबर २०२३ | राज्यात गेल्या १५ दिवसापासून ड्रग्ज प्रकरणातील आरोपी ललित पाटील फरार होता त्याला मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली होती. ड्रग्ज प्रकरणातील मुख्य संशयित ललित पाटील प्रकरणाचा तपास एसआयटी किंवा सीआयडीकडे देण्याच्या सूचना आपण सरकारला केल्या असल्याचे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या शासकीय योजनांच्या आढावा बैठकीनंतर नीलम गोऱ्हे बोलत होत्या. त्या म्हणाल्या, ड्रग्जचे पुणे, नाशिक, मुंबईत धागेदोरे असून, अशा प्रकारच्या अवैध धंद्यांना कोण आश्रय देते. तसेच त्यांना कशामुळे प्लॅटफॉर्म मिळतो, असा सवाल गोऱ्हे यांनी केला. ड्रग्ज प्रकरणाच्या तपासामध्ये आरोग्य आणि वैद्यकीय अभ्यास असलेल्या आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी गोऱ्हे यांनी केली आहे. या प्रकरणात अन्न आणि औषध प्रशासनही तितकेच जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. बेकायदेशीर ड्रग्ज कारखाना सुरू असताना अन्न आणि औषध प्रशासनाकडून दुर्लक्ष कसे होऊ शकते, असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.