कारमधून भरदिवसा लॅपटॉप लांबविला

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

जळगाव ; – शहरातील दाणा बाजारातील एसएसडी ड्रायफ्रूट दुकानासमोर कारमधून एकाचा लॅपटॉप चोरी केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शनिवारी ६ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

शहर पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, दर्शन ईश्वर चोरडिया (वय-२४, रा. वीरदर्शन नगर, जळगाव) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांचे दाणाबाजार येथे एसएसडी ड्रायफ्रूट नावाचे दुकान चालवून ते आपला उदरनिर्वाह करत असतात. शुक्रवारी ५ जानेवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजता त्यांनी त्यांची चारचाकी गाडी दुकानासमोर लावली होती. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी या चारचाकी वाहनातील बॅगेत ठेवलेला लॅपटॉप चोरून नेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर दर्शन चोरडिया यांनी सर्वत्र शोध घेतला,मात्र लॅपटॉप संदर्भात काही माहिती मिळाली नाही. त्यानुसार त्यांनी शनिवारी ६ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Laptop Extended

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS