साक्षीदार | २५ ऑक्टोबर २०२३ | वाणिज्य शाखेत उत्तीर्ण झालेल्या तरुणासाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. ज्या तरुणांना रोजगार नसेल त्यांच्यासाठी हि बातमी महत्वाची असणार आहे. महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडने प्रशिक्षणार्थी लिपिक आणि इतर पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. पात्र उमेदवार एमएससी बँकेच्या अधिकृत वेबसाइट mscbank.com द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. सदर भरती अंतर्गत एकूण १५३ पदांवर भरतीद्वारे नियुक्त्या करण्यात येणार आहेत.
अधिसूचनेनुसार, भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया १० ऑक्टोबर रोजी सुरू झाली असून ३० ऑक्टोबर २०२३ हा अर्ज नोंदणीच शेवटचा दिवस असेल. उमेदवारांनी अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे पात्रता, निवड प्रक्रिया आणि इतर तपशील तपासावे आणि त्यानुसार अर्ज करावा. एमएससी बँकेच्या या भरतीमध्ये चुकीचा भरलेला फॉर्म स्वीकारला जाणार नाही.
एकूण रिक्त जागा : १५३
प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी : ४५ जागा
प्रशिक्षणार्थी लिपिक १०७ जागा : १०७ जागा
कनिष्ठ अधिकारी श्रेणीमध्ये स्टेनो टायपिस्ट : १ जागा
निवड प्रक्रिया :
ऑनलाइन लेखी परीक्षा, वैयक्तिक मुलाखत किंवा कौशल्य चाचणीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.
लेखी परीक्षा फक्त इंग्रजी भाषेत असेल.
वैयक्तिक मुलाखतीसाठी शॉर्टलिस्ट होण्यासाठी, उमेदवारांना पात्रता गुण म्हणून एकूण गुणांच्या किमान ५० टक्के म्हणजेच १०० गुण प्राप्त करणे अनिवार्य असेल.