Gender Ratio News | या शहरात महिलांकडून ‘पती भाड्याने’ घेण्याचा पर्याय!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Gender Ratio News | साक्षीदार न्यूज | स्त्री-पुरुष लिंगगुणोत्तरातील असमतोल ही समस्या आता केवळ भारतापुरती मर्यादित राहिलेली नाही. जगातील अनेक देश आज या सामाजिक संकटाला सामोरे जात आहेत. भारतात स्त्री भ्रूणहत्या आणि लैंगिक भेदभावासारख्या कारणांमुळे महिलांची संख्या तुलनेने कमी असून विवाहासाठी मुली न मिळण्यासारख्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. मात्र, याच्या अगदी उलट परिस्थिती युरोपातील एका देशात निर्माण झाली आहे.

- Advertisement -

लातविया या देशात पुरुषांच्या संख्येत मोठी घट झाल्यामुळे महिलांची संख्या लक्षणीय वाढलेली आहे. या असमतोलाचा परिणाम असा झाला आहे की, तेथील महिलांना पती किंवा घरच्या कामांसाठी पुरुष भाड्याने घेण्याची वेळ आली आहे. काही महिला घरातील जड आणि मेहनतीची कामे करून घेण्यासाठी पुरुषांना तासावर कामावर ठेवतात, तर काही महिला सामाजिक कारणांसाठी पती म्हणूनही हे करार करतात.

माध्यमांतील माहितीनुसार, लातवियामध्ये अशा पुरुषांना दर तासाला साधारण ३ ते ४ डॉलर इतका मोबदला दिला जातो. या पुरुषांकडून घरकाम, बागकाम, दुरुस्ती तसेच काही वेळा सामाजिक साथीदार म्हणूनही भूमिका निभावून घेतली जाते. विशेष म्हणजे, या सेवांसाठी स्वतंत्र वेबसाईट्स उपलब्ध असून त्यावरून महिलांकडून थेट बुकिंग केली जाते.

- Advertisement -

‘न्यूयॉर्क पोस्ट’च्या एका अहवालानुसार, दीर्घकाळापासून सुरू असलेल्या लोकसंख्येतील बदलांमुळे लातवियामध्ये ही परिस्थिती उद्भवली आहे. पुरुषांची संख्या कमी होत असताना महिलांची संख्या वाढत गेल्याने पारंपरिक कुटुंबरचना आणि विवाह व्यवस्थेवरही थेट परिणाम झाला आहे.

लोकसंख्येतील असमतोल किती गंभीर परिणाम घडवू शकतो, याचे हे उदाहरण मानले जात आहे. आज भारतात जिथे महिलांची कमतरता सामाजिक प्रश्न निर्माण करत आहे, तिथे काही देशांमध्ये पुरुषांची कमतरता वेगळ्याच स्वरूपाचे आव्हान उभे करत असल्याचे या घटनेतून स्पष्ट होते.

Gender Ratio News

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS