साक्षीदार | २२ नोव्हेबर २०२३ | जळगाव जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी दिवसाढवळ्या तब्बल २० घरफोड्या करणारा अट्टल गुन्हेगारास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बिलवाडी गावातून मंगळवार २१ नोव्हेंबर रोजी अटक केली आहे. त्याच्याकडून एकुण २० लाख २९ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अशी माहिती पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांनी बुधवारी २२ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता आयोजित पत्रकार परिषदेत दिली. याप्रकरणी जळगाव तालुक्यातील बिलवाडी येथील प्रविण सुभाष पाटील (वय-३०)याला पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील सार्वे या गावी ३ दिवसांपूर्वी दिवसा चोरी झाली होती. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील स.फौ. विजयसिंह पाटील यांना मिळालेला गोपनीय माहितीनुसार ही चोरी बिलवाडी गावातील प्रवीण पाटील यानेच केल्याचे समजले. त्यानुसार संशयित आरोपी प्रवीण सुभाष पाटील वय 30 राहणार बिलवाडी तालुका जिल्हा जळगाव याला त्याच्या गावातून मंगळवारी २१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी अटक केली. त्याने सुरुवातीला आपण चोरी केले नसल्याचे सांगितले. नंतर खाक्या दाखवताच त्याने चोरी केल्याची कबुली दिली. गेल्या दोन वर्षात त्याने आतापर्यंत जळगाव जिल्ह्यात वेगवेगळ्या भागात जाऊन दिवसाढवळ्या चोरीचे २० गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. त्यानुसार त्याच्याकडून १७३ ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने, १० लाख रुपये किमतीची स्विफ्ट कार, ९० हजार रुपये किमतीची पल्सर दुचाकी असा एकूण २० लाख २९ हजार रूपये मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला एक दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. जिल्ह्यात ग्रामपंचायत तिची निवडणूक पार पाडण्यात आले. दरम्यान बिलवाडी गावाच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी संशयित आरोपी प्रविण पाटील याने अपक्ष म्हणून उमेदवार उभा होता. त्यात केवळ ४० मतांनी पराभव झाला होता. असे देखील माहिती समोर आलेली आहे.
यांनी केली कारवाई
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि निलेश राजपूत, पोउनि गणेश वाघमारे, गणेश चौबे, स.फौ. विजयसिंह पाटील, पोहेकॉ सुधाकर अंभोरे, महेश महाजन, लक्ष्मण पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, संदीप साळवे, विजय पाटील, किरण चौधरी, सचिन महाजन, दर्शन ढाकणे, ईश्वर पाटील अशांचे पथक रवाना झाले.