‘चुलीत गेले नेते, चुलीत गेला पक्ष : नेत्यांना या गावात बंदी !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | २१ ऑक्टोबर २०२३| मराठा आरक्षणाचा लढा राज्यात तीव्र होत असतांना शेवगाव तालुक्यातील भावीनिमगाव, मठाचीवाडी, मजले शहर येथे सकल मराठा समाजाच्या वतीने गावाच्या चौकात सर्वपक्षीय राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली. याचा फलक गावाच्या वेशीवर लावण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत सर्व पक्षाच्या नेत्यांना गावात येऊ देणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. ‘चुलीत गेले नेते, चुलीत गेला पक्ष; मराठा आरक्षण हेच आमच लक्ष्य’असा मजकूर फलकावर आहे.

- Advertisement -

प्रस्थापित राज्यकर्ते हे मराठ्यांची उधड बाजू कधीच घेताना दिसले नाही आणि अजूनही दिसत नाहीत. त्यांना मताची भीती वाटते म्हणून ते आपल्या बाजूने येत नाहीत. राजकीयदृष्ट्या मराठे जागे असतात. पण, त्यांना मतदार म्हणून देखील जागे होणे गरजेचे आहे. नवा राजकीय पर्याय देखील आपण उभा केला पाहिजे, तरच हे सर्व प्रस्थापित पक्ष वठणीवर येथील, हे कळल्याने आणि मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या प्रेरणेने प्रेरित व हक्काच्या आरक्षणासाठी ते देत असलेल्या लढाईस पाठिंबा म्हणून भावीनिमगाव, मठाचीवाडी, मजले शहर येथील सकल मराठा समाजाने सर्व आजी-माजी राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करून जिल्ह्यात सर्व प्रथम पुढाकार घेतला असल्याचे नंदकुमार शेळके यांनी सांगितले. गुरुवारपासून भावीनिमगाव येथील गावबंदीचा बोर्ड सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS