ऐनपूर (सुनिल भोळे) ; – येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी पुण्यतिथी निमित्ताने लेवा गणबोली दिन प्राचार्य डॉ जे बी अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ एस एन वैष्णव हे होते तर प्रमुख वक्ते म्हणून डॉ एस एम पाटील व डॉ पी आर महाजन हे होते. सुरुवातीला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. डॉ एस ए पाटील यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या काव्यसंग्रह वर प्रकाश टाकला. डॉ पी आर महाजन यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा जिवनपट समजावुन सांगितला तर अध्यक्षीय भाषणात डॉ एस एन वैष्णव यांनी जीवनाचा सार म्हणजे कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे लेखन. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा हेमंत बाविस्कर यांनी केले तर आभार डॉ एस एस साळुंखे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा व्ही एच पाटील, डॉ पी आर गवळी, प्रा प्रदीप तायडे, प्रा अक्षय महाजन, श्री गोपाल पाटील, श्रेयस पाटील यांनी मेहनत घेतली.