साक्षीदार | २४ नोव्हेबर २०२३ | दिवस सुरु झाल्यापासून प्रत्येक व्यक्ती रोजगार करीत असतो पण हाच रोजगार करून ज्यांना महिन्याला वेतन मिळते त्यातून भविष्यातील गरजा बघून अनेक लोक पैश्याची साठवणूक करीत असतात. त्यामुळे अनेक प्लान ते शासकीय व निमशासकीय माध्यमातून घेत असतात, आता महिलासाठी एक विशेष प्लान एलआयसीने दिल्याने अनेक महिलांना आता पैसे गुंतवणूक करण्याची विशेष सोय मिळाली आहे. एक योजना म्हणजे LIC आधार शिला योजना. या योजनेचं खास वैशिष्ट्य असं की दररोज अवघ्या 58 रुपयांच्या छोट्या गुंतवणुकीतून मोठी रक्कम उभारली जाऊ शकते.
LIC आधार शिला योजना ही एक नॉन-लिंक्ड, जीवन विमा योजना आहे. या योजनेत फक्त महिलाच गुंतवणूक करू शकतात. या पॉलिसीच्या मॅच्युरिटीवर गुंतवणूकदाराला निश्चित रक्कम मिळते. जर पॉलिसीधारकाचा पॉलिसी पूर्ण होण्यापूर्वी मृत्यू झाला तर अशा परिस्थितीत कुटुंबाला आर्थिक मदत मिळते. आधार कार्डधारक प्रत्येक महिला या योजनेत गुंतवणूक करू शकते. यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी महिलेचे वय 8 ते 55 वर्षे दरम्यान असावे लागते. तुम्ही ही पॉलिसी 10 वर्षे ते 20 वर्षांच्या कालावधीसाठी खरेदी करू शकता. मॅच्युरिटीच्या वेळी महिलेचे कमाल वय 70 वर्षे असू शकते. या योजनेत तुम्हाला 2 लाखांपासून कमाल 5 लाख रुपयांपर्यंतची विमा रक्कम मिळू शकते.
जर तुम्ही दररोज 58 रुपये गुंतवले तर या योजनेत तुम्हाला मॅच्युरिटीच्या वेळी लाखो रुपये मिळतील. तुम्ही तुमची प्रीमियम रक्कम मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर भरू शकता. समजा सध्या तुमचे वय 20 वर्षे आहे. आजपासून तुम्ही दररोज 58 रुपये जमा केल्यास म्हणजेच या योजनेत गुंतवणूक केल्यास, वार्षिक आधारावर तुम्हाला 21,918 रुपये प्रीमियम जमा करावा लागेल. तुम्ही त्यात सतत 20 वर्षे गुंतवणूक केल्यास, तुमची विमा रक्कम 4,29,392 रुपये असेल. अशा प्रकारे, जेव्हा पॉलिसी 20 वर्षांनी मॅच्युअर होईल तेव्हा तुम्हाला 7,94,000 रुपये मिळतील.