back to top
गुरूवार, ऑगस्ट 21, 2025

LIC Smart Pension Plan 2025 ची धमाकेदार योजना: एकदा गुंतवणूक करा आणि मिळवा 12,000 रुपयांची पेन्शन !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

LIC Smart Pension Plan 2025  साक्षीदार न्युज । भविष्यात आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागू नये, यासाठी अनेकजण आतापासूनच गुंतवणुकीचा विचार करतात. जर तुम्हाला निवृत्तीनंतर दर महिन्याला ठराविक रक्कम हवी असेल, तर भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) ‘स्मार्ट पेन्शन प्लॅन’मध्ये गुंतवणूक हा उत्तम पर्याय ठरू शकतो. या योजनेत एकदा गुंतवणूक करून तुम्ही 12,000 रुपयांची पेन्शन मिळवू शकता.

- Advertisement -

काय आहे या योजनेचे वैशिष्ट्य
एलआयसीच्या स्मार्ट पेन्शन प्लॅनमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगला परतावा मिळेल. या योजनेत तुम्ही सिंगल किंवा जॉइंट अकाउंट उघडू शकता, ज्यामुळे पती-पत्नी दोघांनाही लाभ मिळू शकेल. या योजनेद्वारे मासिक, तिमाही किंवा सहामाही आधारावर पेन्शन घेता येते, तसेच अॅन्युटीचाही लाभ मिळतो.

कशी मिळेल पेन्शन ?
या योजनेत किमान 1 लाख रुपये गुंतवावे लागतात. उदाहरणार्थ, जर तुम्ही 1 लाख रुपये गुंतवले, तर तुम्हाला वर्षाला 12,000 रुपये पेन्शन मिळेल. म्हणजेच, दर महिन्याला 1,000 रुपये, तिमाहीला 3,000 रुपये किंवा सहामाही आधारावर रक्कम मिळू शकते. जर 40 वय असलेल्या व्यक्तीने 30 लाख रुपये गुंतवले, तर त्यांना 12,000 पेक्षा जास्त पेन्शन मिळू शकते.

- Advertisement -

कोण घेऊ शकते फायदा ?
40 ते 80 वयोगटातील भारतीय नागरिक या योजनेत सहभागी होऊ शकतात. योजनेत किमान 12,000 रुपयांची अॅन्युटी खरेदी करणे बंधनकारक आहे. गुंतवणुकीवर चांगले व्याज मिळते, ज्यामुळे वयाच्या 60 नंतर आर्थिक चणचण भासणार नाही.

कशी कराल गुंतवणूक ?
या योजनेत एकदाच गुंतवणूक करावी लागते. निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न हवे असल्यास हा प्लॅन तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. LIC च्या या योजनेने अनेकांना आर्थिक सुरक्षिततेची हमी दिली आहे. आताच योजनेची माहिती घ्या आणि भविष्यासाठी तयारी करा !

ATMFees | एटीएममधून पैसे काढणे महागणार: १ मे २०२५ पासून नवे शुल्क लागू

Raver Honey Trap | रावेर हनी ट्रॅप प्रकरणात 100 हून अधिक जण ,अनेकांनी आत्महत्या केल्याचा संशय ?

धक्कादायक घटना: सावत्र पित्याच्या अत्याचाराला कंटाळून मुलीने कापले पित्याचे …
Multibagger Stock | 7 रुपयांचा शेअर 1800 वर, 1 लाखाचे झाले 2.33 कोटी; हा मल्टीबॅगर स्टॉक कोणता ?

LIC Smart Pension Plan 2025

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Domestic Violence | यावल येथे कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार; पाच...

Domestic Violence | साक्षीदार न्यूज | यावल येथील पोलीस ठाण्यात एका महिलेने आपले पती, सासू, जेठ, जेठाणी आणि नणंद यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठी...

Electric shock | वरखेडी गावात करंट लागल्याने पाच जणांचा...

Electric shock एरंडोल | साक्षीदार न्यूज | आज सकाळी तालुक्यातील वरखेडी गावात एक हृदयद्रावक घटना घडली. गावालगतच्या म्हसावद रस्त्याजवळील शेतात कामासाठी जात असताना वीज...

CM Rekha Gupta Attacked | भाजपच्या मुख्यमंत्र्याच्या जनता दरबारात...

CM Rekha Gupta Attacked साक्षीदार न्यूज । आज, २० ऑगस्ट २०२५ रोजी जनता दरबारात एका ३५ वर्षीय तरुणाने हल्ला केला, ज्यामुळे राजधानीत खळबळ उडाली...

RECENT NEWS