लोकसभा निवडणुकीत क्रांतीची मशाल पेटवा : उन्मेषदादा पाटील

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

लोकसभा निवडणुकीत क्रांतीची मशाल पेटवा : उन्मेषदादा पाटील
भडगावातील सभेत मविआ नेत्यांचा सत्ताधार्‍यांवर जोरदार हल्लाबोल

- Advertisement -

भडगाव, दिनांक ९ ( प्रतिनिधी ) : यंदाची लोकसभा निवडणूक ही देशातील विकासासाठी आणि दडपशाहीला चाप लावण्यासाठी आहे. या निवडणुकीत क्रांतीची मशाल पेटवून महाविकास आघाडीचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन माजी खासदार उन्मेषदादा पाटील यांनी केले. ते भडगावात आयोजीत सभेत बोलत होते. याप्रसंगी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सत्ताधार्‍यांवर कडाडून प्रहार केले.

जळगाव लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील यांच्या प्रचारासाठी भडगावातील आझाद चौकात भव्य सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेला माजी खासदार उन्मेषदादा पाटील, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा पवार, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मुफ्ती हारून नदवी, शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी, कॉंग्रेस तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी, राष्ट्रवादी कॉंग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष विकास पाटील, शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख जे.के. पाटील, उपजिल्हा प्रमुख दीपक पाटील, शहरप्रमुख शंकर मारवाडी, माजी नगरसेविका योजनाताई पाटील, माजी सभापती रामकृष्ण पाटील, ज्येष्ठ शिवसैनिक इसाक मलीक, राजू देशमुख, अभिषेक प्रदीप पवार, दीपक महाजन यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

- Advertisement -

याप्रसंगी उपस्थित वक्त्यांनी केंद्र व राज्य सरकारवर कडाडून टिका केली. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मुफ्ती हारून नदवी यांनी आपल्या अतिशय आक्रमक भाषणातून सरकारवर हल्लाबोल करतांनाच तेरा मई बीजेपी गयी ! असा नारा बुलंद करताच त्यांना भरभरून दाद मिळाली. वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी सर्व काही निष्ठेने विकत घेता येत असले तरी निष्ठा विकत घेता येत नसल्याचे नमूद करतांनाच सत्ताधार्‍यांवर कडाडून प्रहार केला. लोकसभा निवडणूक ही आपल्या स्वाभीमानाची आणि संविधान वाचवण्यासाठीची निवडणूक असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी मोदींनी जनतेला फसविले असल्याचा आरोप आपल्या मनोगतातून केला. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा पवार म्हणाले की, भाजपला ३२ टक्के मते मिळाली असली तरी उर्वरित मते फुटल्याने त्यांना विजय मिळाला होता. मात्र आता सर्वांनी एकजुटीने भाजपला हरविण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले.

माजी खासदार उन्मेषदादा पाटील यांनी आक्रमक शैलीत सत्ताधार्‍यांना झोडपून काढले. ते म्हणाले की, भारतीय जनता पक्ष बहुजनांच्या विरोधातील आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याची भाषा एकाकडे करतांनाच दुसरीकडे सदावर्ते यांच्या सारख्यांना गिरीश महाजन व देवेंद्र फडणवीस पुढे करत असल्याची टिका त्यांनी केली. सत्ताधार्‍यांना प्रॉपर्ट्या जमा करण्यात रस असून ते पैशांचे राजकारण करत आहेत. तर आमदार किशोर पाटील व गिरीश महाजन यांनी गिरणेवरली बलून बंधार्‍यांसाठी काहीही केले नसल्याचा आरोप देखील त्यांनी केला. पाचोरा व भडगाव तालुका हा दुष्काळग्रस्त नव्हे तर दुष्काळसदृश्य घोषीत केल्यामुळे शेतकर्‍यांचे दीडशे कोटींचे नुकसान झाल्याची टिका त्यांनी केली. किशोर पाटलांनी लोकशाहीचा खून केल्याचे टिकास्त्र त्यांनी सोडले.

याप्रसंगी शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रीय कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार, आप आदी पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS