Lingayat Samaj | लिंगायत समाजाचा आरोग्यासाठी मोठा पुढाकार! मोफत कॅन्सर तपासणी व रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Lingayat Samaj | साक्षीदार न्यूज | महात्मा बसवेश्वर लिंगायत समाजातर्फे रविवारी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत इंडियन रेडक्रॉस सोसायटीजवळ मोफत कॅन्सर तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. समाजाच्या या स्तुत्य उपक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

- Advertisement -
Lingayat Samaj
Lingayat Samaj

या शिबिरामध्ये तोंडाचा कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर, फुफ्फुस, आतडे, यकृत (लिव्हर), स्वादुपिंड तसेच गर्भाशयाच्या कॅन्सरबाबत तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले. यासोबतच रुग्णांना शस्त्रक्रिया, रेडिएशन थेरपी आणि केमोथेरपीबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

चांडक कॅन्सर हॉस्पिटलचे संचालक डॉ. नीलेश चांडक यांनी रुग्णांची प्रत्यक्ष तपासणी करून योग्य वैद्यकीय सल्ला दिला. कॅन्सरसारख्या गंभीर आजाराबाबत वेळेवर निदान होणे किती महत्त्वाचे आहे, याचे महत्त्वही यावेळी त्यांनी उपस्थितांना समजावून सांगितले.

- Advertisement -

Lingayat Samaj

या कार्यक्रमावेळी इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे संचालक डॉ. प. प्रसन्नकुमार रेडासणी, महात्मा बसवेश्वर लिंगायत समाजाचे अध्यक्ष संदीप वाणी, कार्याध्यक्ष विशाल लिंगायत, वीरशैव लिंगायत गवळी समाज युवा प्रदेशाध्यक्ष कृष्णा गवळी यांच्यासह समाजातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यामध्ये गजानन आकाशे, समीर गुळवे, जितेंद्र आंबेकर, रश्मी वाणी, सविता देशमुख, पंकज सदावर्ते, दिलीपआप्पा मोगरे, दीपक जोमीवाळे, शंकर काटकर, प्रकाश लंगोटे, पुष्पा देशमुख, मंगला आखाडे, श्वेता वाणी, मंजुषा कस्तुरे, अर्चना आकाशे, प्रियांका पराशर, सचिन देशमुख आदी समाजबांधव-भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये कॅन्सर प्रतिबंधाबाबत जनजागृती झाली असून, समाजसेवेच्या दिशेने हा एक आदर्श उपक्रम ठरल्याचे मत उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आले.

Lingayat Samaj

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Sand Mafia | जळगाव जिल्ह्यात अवैध वाळूच्या डंपरने घेतला...

Sand Mafia जळगांव | सुनिल भोळे | जिल्ह्यात वाळू चोरी थांबण्याचे नाव घेत नाही .साक्षीदार न्यूजने तालुका पोलीस स्टेशनचे रामकृष्ण इंगळे यांचा वाळू चोरी...

Kingaon PHC | किनगावात गरोदर मातांच्या जीवाशी खेळ; एकाच...

Kingaon PHC किनगाव | मिलिंद जंजाळे | एकीकडे सरकार 'सुरक्षित मातृत्व' आणि 'डिजिटल इंडिया'च्या गप्पा मारत असताना, जळगाव जिल्ह्यातील किनगाव येथे मात्र मानवतेला काळिमा...

Jalgaon Banana Price | केळी दरात मोठी घसरण! जळगावातील...

Jalgaon Banana Price जळगाव | मिलिंद जंजाळे | जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी सध्या गंभीर आर्थिक अडचणीत सापडले असून, बाजारात मिळणाऱ्या अत्यल्प दरामुळे नाराजी वाढत...

RECENT NEWS