जळगाव ; – तालुक्यातील देऊळवाडे येथील तापी नदीच्या किनारी आणि परिसरात अवैधरित्या गावठी दारू हातभट्टीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत सुमारे ४ लाख ९४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात वेगवेगळे ६ गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
👉🏾 क्लिक करा ; – तहसीलदार बनले कॉलेज कुमार ; वाळू चे १६ ट्रॅक्टर पकडले
जळगाव जिल्ह्यात अवैधरित्या गावठी दारू बनविणाऱ्या हातभट्टींवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिलेले होते. त्यानुसार जळगाव तालुक्यातील देऊळवाडे गावासह परिसरात अवैधरित्या गावठी दारू भट्टीतून सुरू करून दारू विक्री होत असल्याची गोपनिय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक व्ही.टी. भुकन यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सुचना देण्यात आला. त्यानुसार जळगाव आणि चोपडा येथील पथकाने गुरूवारी ४ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजता कारवाई करण्याला सुरूवात केली. दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने जळगाव तालुक्यातील देऊळवाडे येथील गिरणा नदीच्या काठावर आणि इतर परिसरात अवैधरित्या सुरू असलेल्या गावठी दारू भट्टीवर छापा टाकला. या कारवाईत पथकाने २० हजार लिटर कच्ची दारू आणि तयार असलेली २२२ लिटर दारू असा एकुण ४ लाख ९४ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात वेगवेगळे ६ गुन्हे दाखल केले आहे.