स्थानिक गुन्हा शाखेने नगर सेवकाच्या खुनाचे दोन आरोपी जेरबंद

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार न्यूज | 13 फेब्रुवारी 2024|  चाळीसगाव शहरात गेल्या आठवड्यात भाजपाचे माझी नगरसेवकाचा फायरिंग करुन खून करण्यात आल होता. त्या गुन्ह्यातील २ फरार आरोपींना अखेर स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी जेरबंद केले आहे .

- Advertisement -

याबाबत सविस्तर असे की , चाळीसगाव शहर पो.स्टे. येथे दाखल गुन्ह्यातील आरोपीतांनी चाळीसगाव शहरातील नगरसेवक महेंद्र ऊर्फ बाळू मोरे यांचेवर दि.७ रोजी गोळीबार करुन त्यांचा खून करण्यात आला होता. गुन्ह्यातील आरोपी हे फायरिंग करुन पळून गेले होते. पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, चाळीसगाव अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसन नजनपाटील यांना सदर गुन्हयांतील आरोपीतांचा शोध घेवून त्यांना तात्काळ अटक करण्याबाबत योग्य त्या सुचना देवून मार्गदर्शन केले होते.

त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांना दि.११ रोजी गोपनिय माहिती मिळाली की, सचिन सोमनाथ गायकवाड रा.घाटरोड, चाळीसगाव ता.चाळीसगा, जि.जळगाव, अनिस ऊर्फ नव्वा शेख शरिफ शेख रा. हुडको चाळीसगाव ता. चाळीसगाव जि. जळगाव हे अहमदनगर व पुणे येथे गेल्याची माहिती मिळाली होती. एलसीबीच्या पथकातील पोलीस अंमलदार सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील, हवालदार सुधाकर अंभोरे, लक्ष्मण पाटील, राहुल पाटील यांना तात्काळ अहमदनगर व पुणे येथे रवाना केले. त्याप्रमाणे वरील पथकातील पोलीस अंमलदार यांनी वरील आरोपीतांचा अहमदनगर व पुणे येथे गोपनिय माहितीच्या आधारे शोध घेत असतांना त्यांना माहिती मिळाली की, सदर आरोपी हे लोणीकंद परिसर, पुणे येथे असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी आरोपींना लोणीकंद परिसरात पिंजून काढून शिताफिने ताब्यात घेतले.

- Advertisement -

पोलीस कारवाई करतांना तपासात हवालदार अक्रम शेख, महेश महाजन, प्रमोद लाडवंजारी, शिवदास नाईक, हेमंत पाटील, किशोर मोरे, ईश्वर पाटील यांनी सुध्दा सहकार्य केले आहे. आरोपीतांना तपासकामी चाळीसगाव शहर पो.स्टे.च्या ताब्यात देण्यात आले आहे.

Local Crime Branch

 

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS