Lok Sabha General Election 2024 ; जळगाव ( sakshidar news ) ; – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ SVEEP अंतर्गत जळगाव जिल्हा स्तरीय ऑयकान म्हणून येथील गांधी रिसर्च फाऊंडेशन चे सहकारी मदन रामनाथ लाठी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
ही नियुक्ती जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री आयुष प़साद सरांनी मदन लाठी यांचे सामाजिक कार्यानुसार केली आहे.
यात जळगाव जिल्ह्यातील मतदारांना मतदाना करिता प़ेरीत करणेसाठी व नागरिकांमध्ये मतदान या राष्ट्रीय कर्तव्याची भावना वृध्दिंगत करणेसाठी जनजागृती आणि निवडणुक प़क़ियेत नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी प़ेरणा निर्माण करण्याचा उद्देशाने SVEEP अंतर्गत राजकीय पक्ष किंवा व्यक्ती यांचेशी राजकीय स्वरूपाचे संबंध ठेवणार नाहीत या अटीवर जिल्हा ऑयकान म्हणून घोषित करण्यात आले आहे.
या नियुक्ती बद्दल लाठींचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Lok Sabha General Election 2024 ; मदन लाठी यांची जिल्हास्तरीय ऑयकान म्हणून नियुक्ती
- Advertisement -