जळगांव ; – महाराष्ट्र राज्य पुरस्कृत अनुलोम या सेवाभावी संस्थेद्वारे सामाजिक सेवा करणाऱ्या डॉ.सौ मंजुषा पंकज पवनीकर यांना प्रभू श्रीरामाची मुर्ती प्रदान केली . यानिमित्त छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. श्रीरामाच्या नूतन बालमूर्ती प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने आज रामानंदनगर बस स्टॉप समोरील राममंदिराच्या प्रांगणात कार्यक्रम झाला. तसेच “रामरक्षा” या विषयावर सौ मृदुला कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. पाहुण्यांचे स्वागत सौ.सोनाली पिंगळे व पंकज पवनीकर यांनी केले .प्रास्ताविक करताना अनुलोमचे विभाग जनसेवक दत्ता नाईक यांनी अनुलोम ची माहिती उपस्थित त्यांना दिली. याप्रसंगी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठविलेल्या पत्राचे वाचन सौ सोनल महाजन यांनी केले . सौ मृदुला कुलकर्णी यांनी आपल्या भाषणात रामरक्षा स्तोत्राचे महत्त्व विशद केले. तसेच रामरक्षा स्तोत्रा मधील काही श्लोकांचा आपल्या शरीरावरती कसा परिणाम होतो, हे सोदाहरण स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सोनल अनंत महाजन यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ सौ मंजुषा पंकज पवनीकर यांनी केले. या कार्यक्रमाला परीसरातील नागरीक उपस्थित होतेे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनुलोमचे भाग जनसेवक पवन येपुरे,सौ. प्रीती मिश्रा, सौ.लता काळे, सौ. माधुरी पुंडे, सौ. प्रीती कुलकर्णी व विपिन कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले.