अल्पवयीन मुलीसोबत प्रेम, फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | २८ ऑक्टोबर २०२३ | जळगाव शहरातील एका अल्पवयीन तरुणीला खोटे नाव सांगून ओळख निर्माण करीत तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध निर्माण करीत व नंतर त्याचे फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी अफताब उर्फ अप्पू कलमीस बेग (२३, रा. समतानगर) या तरुणाविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका भागात राहणारी तरुणी एका नामांकीत महाविद्यालयात इयत्ता अकरावीमध्ये शिक्षण घेत होती. सध्या ती एका महाविद्यालयात अभियांत्रिकीची शिक्षण घेत आहे. इयत्ता अकरावीमध्ये असतानाच तिच्याशी अप्पू याने खोटे नाव सांगून ओळख निर्माण केली. त्यांच्यात संवाद वाढत जाऊन त्याचे रुपांतर पुढे प्रेमात झाले. नंतर ते दोघे कॅफेमध्ये सोबत जावू लागले. त्यावेळी तरुणाने दोघांचे फोटो मोबाईलमध्ये काढले. त्यानंतर २१ ऑगस्ट २०२१ रोजी तो तरुणीला कोल्हे हिल्स परिसरात मित्राच्या खोलीवर घेऊन गेला. तेथे अत्याचार केला. त्यानंतर सोबतचे फोटो, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी अत्याचार करीत राहिला. नेहमीच्या ब्लॅकमेलिंगमुळे तरुणी आजारी पडली व हा त्रास असह्य झाल्याने या १८ वर्षीय तरुणीने शुक्रवार, २७ ऑक्टोबर रोजी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अफताब उर्फ अप्पू कलमीस बेग याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि गोपाल देशमुख करीत आहेत

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

Heart Attack | धक्कादायक! धावत्या दुचाकीवरच तरुणाचा मृत्यू; हृदयविकाराचा...

Heart Attack यावल | मिलिंद जंजाळे | यावल शहरातील अंकलेश्वर–बऱ्हाणपूर राज्य मार्गावरील चोपडा नाक्याजवळ एका ३२ वर्षीय तरुणाचा धावत्या दुचाकीवर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने...

RECENT NEWS