LPG Supply Update | गॅस वापरात मोठा बदल! आता एलपीजी सिलिंडर बुकिंगसाठी २५ दिवसांची सक्ती; ग्राहकांमध्ये संभ्रम

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

LPG Supply Update नवी दिल्ली |साक्षीदार न्यूज | घरगुती एलपीजी गॅस वापरणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. तेल विपणन कंपन्यांनी घरगुती एलपीजी सिलिंडर बुकिंगच्या नियमांमध्ये बदल करत दोन सिलिंडर बुकिंगमध्ये किमान २५ दिवसांचे अंतर अनिवार्य केले आहे. यापूर्वी हा कालावधी १५ दिवसांचा होता.

- Advertisement -

नवीन नियम ७ मार्चपासून लागू करण्यात आले असून यामुळे घरगुती गॅस सिलिंडरच्या बुकिंग प्रक्रियेत बदल जाणवू लागले आहेत. अनेक ग्राहकांनी १५ दिवसांनंतर सिलिंडर बुक करण्याचा प्रयत्न केला असता सिस्टिमकडून बुकिंग स्वीकारले जात नसल्याचे दिसून आले. नंतर कंपन्यांनी २५ दिवसांचा नियम लागू असल्याचा संदेश दाखविण्यास सुरुवात केली.

तुटवड्यामुळे नियमात बदल?

- Advertisement -

सध्या युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसच्या उपलब्धतेवर दबाव वाढल्याचे सांगितले जात आहे. यामुळे काही ठिकाणी हॉटेल आणि कंपन्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या गॅस पुरवठ्यावरही मर्यादा आणण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीतही सुमारे ६० रुपयांची वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. भविष्यात किंमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ग्राहकांकडून साठा रोखण्याचा प्रयत्न

काही ग्राहकांकडे एकापेक्षा जास्त गॅस कनेक्शन असल्याने सिलिंडर साठवून ठेवणे किंवा घरगुती गॅसचा वापर हॉटेल व्यवसायासाठी होण्याची शक्यता वर्तवली जात होती. या पार्श्वभूमीवर गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी कंपन्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

नवीन नियमांतील प्रमुख बदल

  • २५ दिवसांचे अंतर: एका सिलिंडरच्या डिलिव्हरीनंतर पुढील सिलिंडर बुक करण्यासाठी किमान २५ दिवस थांबावे लागेल.

  • काळाबाजारावर नियंत्रण: घरगुती सिलिंडरचा व्यावसायिक वापर कमी करण्याचा प्रयत्न.

  • डिलिव्हरी व्यवस्थेत सुधारणा: रांगेत असलेल्या ग्राहकांना अधिक जलद सेवा मिळण्याची शक्यता.

या नव्या नियमामुळे गॅस वापर करणाऱ्या ग्राहकांना नियोजनपूर्वक सिलिंडर बुकिंग करावे लागणार आहे.

LPG Supply Update

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Women’s Day Jalgaon | जळगावात चर्मकार महिला संघाचा महिला...

Women's Day Jalgaon जळगाव | साक्षीदार न्यूज | चर्मकार महिला संघातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त जळगाव येथे रविवार, दि. 8 मार्च रोजी संत रोहिदास प्रतिष्ठान सभागृह,...

World Marathi Conference | विश्व मराठी संमेलनात जळगावच्या विद्यार्थिनींची...

World Marathi Conference जळगाव | साक्षीदार न्यूज | महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी आपल्या...

Chalisgaon Insurance Fraud | ५० लाखांच्या विमा दाव्यासाठी बनावट...

Chalisgaon Insurance Fraud चाळीसगाव | सुनिल भोळे | तालुक्यातील दहिवद फाट्यावर झालेल्या कथित अपघाती मृत्यू प्रकरणात धक्कादायक फसवणूक उघडकीस आली आहे. ५० लाख रुपयांच्या पर्सनल...

RECENT NEWS