back to top
शुक्रवार, मे 9, 2025

Blood Donation | जागतिक आरोग्य दिनानिमित्त मदन लाठी यांचे ९१ वे रक्तदान

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Blood Donation साक्षीदार न्युज । जळगाव येथील गांधी रिसर्च फाउंडेशन चे सहकारी आणि जळगाव जिल्हा लोकसभेच्या आणि विधानसभा निवडणुकीचे जिल्हा ऑयकाॅन , पर्यावरण दूत श्री मदन रामनाथ लाठी यांनी आपले ९१ वे रक्तदान जागतिक आरोग्य दिनानिमित्त दि ७ एप्रिल २०२५ रोजी डॉ च्या मार्गदर्शनानुसार यशस्वी पणे केशवस्म़ॄती प्रतिष्ठान संचलित माधवराव गोंडवलकर स्वयंसेवी रक्तकेंद़ येथे केले.

- Advertisement -

Blood Donation

मागील ९० वे रक्तदान त्यांनी ६ जानेवारी केले होते

- Advertisement -

रक्तदान म्हणजे सर्वश्रेष्ठ दान माणसाने आयुष्यात येऊन स्वच्छंदी रक्तदान करून लाडके देवाचे व्हावे हे ब्रीदवाक्य गांधी रिसर्च फाउंडेशन चे सहकारी आणि जिल्हा आयकॉन आणि सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार आणि भोकर येथील तापीकाच्या गावातील गरीब शेतकऱ्याचे घरी जन्मास आलेले मदन रामनाथ लाठी यांचे आहे.
दर तीन महिन्यांनंतर डॉ च्या सल्ल्यानुसार करणारे एक नियमित रक्तदाते आहेत

बऱ्याच दिवसांपासून ते दर तीन महिन्यांनंतर नियमित रक्तदान डॉ च्या सल्ल्यानुसार नियमित करीत आहे.

मागील रक्तदान केलेला दिवस म्हणजे त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस १२ डिसेंबर २०२३ सर्वांचे प्रेरणा स्थान असलेले & जैन उद्योग समुहाचे संस्थपाक आदरणीय मोठे भाऊ ( कै भवरलाल जैन ) चा ८६ वा वाढदिवस & जैन इर्रीगेशन चे सहकारी मदन लाठी यांचे ८६ वे रक्तदान हा एक योग योगच म्हणावा लागेल.

आतापर्यंत त्यांनी विविध प्रसंगी रक्तदान करून एक रक्तदान या उपक्रमास मोलाचे सहकार्य केले असून त्यांनी पहिल्या करोना काळात नोव्हेंबर २० & १२ डिसेंबर २०२० रोजी प्लाझ्मा देऊन सोलापूरचे घाडगे याना & इतर तीन रुग्णास त्या काळात जीवनदान मिळाले असून त्यावेळी मदन लाठी याना विविध संस्थांनी कोरोना योद्धा सन्मानपत्र दिले होते त्यात माहेश्वरी युवा संघटना, महाराष्ट्र & विविध संस्थांनी त्यांचा सत्कार केला होता
२५ फेब्रुवारी २०२३ रोजी मोठे भाऊंचे स्मृतिदिनादिमित्त सुद्धा त्यांनी रक्तदान केले होते
१ ऑक्टोबर २०२१ रोजी तत्कालीन राष्ट्रपती आदरणीय श्री रामनाथ कोविन्द सरांचा ७६ वा वाढदिवस & मदन लाठी यांचे ७६ वे रक्तदान पुण्यात पिंपरी चिंचवड येथील शासकीय वाय सि एम मध्ये केले होते त्यावेळी राष्ट्रपती यांचे निजी सचिव यांनी मदन लाठी यांचे उपक्रमाबद्दल मेल द्वारे अभिनंदन केले होते
१७ सप्टेंबर २०२४ रोजी आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदी सरांचा वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी आपले ८९ वे रक्तदान केले होते.

२०१९ मध्ये आपल्या देशाचे तत्कालीन आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन सर आणि महाराष्ट्र शासनाचे /राज्यातील विविध सचीव यांनी सुध्दा या उपक्रमाबद्दल अभिनंदन केलेले होते आणि करत आहेत.

असे विविध प्रसंगीं मदन लाठी रक्तदान करी असून वयाच्या ६५ वर्षापर्यंत आणि डॉ च्या सल्ल्यानुसार रक्तदान करणार आहेत . 

Blood Donation

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Sharad Pawar Supriya Sule Ajit Pawar | राष्ट्रवादीत पुन्हा...

Sharad Pawar Supriya Sule Ajit Pawar साक्षीदार न्युज | पुणे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पुन्हा एकदा विलीनीकरणाचे वारे वाहू लागले आहेत. पक्षाचे सर्वेसर्वा शरद...

IPL 2025 | भारत-पाकिस्तान तणाव: आयपीएल 2025 वर संकट,...

IPL 2025 साक्षीदार न्युज  | भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2025 च्या भवितव्यावर अनिश्चिततेचे ढग दाटले आहेत. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर...

Mohini Ekadashi Horoscope | मोहिनी एकादशी 2025: सर्व राशींसाठी...

मोहिनी एकादशी 2025 रोजी सर्व राशींसाठी आर्थिक लाभाचे योग! मेषला नवीन संधी, मिथुनचे कर्ज कमी, कुंभसाठी फोकस महत्त्वाचा. जाणून घ्या तुमचे राशिभविष्य. Mohini Ekadashi Horoscope...

RECENT NEWS

WhatsApp Group