उमरगा येथे महाआरोग्य, रक्तदान शिबिराचे आयोजन
दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांना साहित्य वाटप होणार उमरगा जनता बँकेचे चेअरमन पाटील यांची माहिती
उमरगा । साक्षीदार न्युज । उमरगा येथे ४ व ५ मार्च रोजी महाआरोग्य शिविराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात कॅन्सर, हृदयरोग, मधुमेह, खीरोग, बालरोग, नेत्र, कान, नाक, घसा आदीसह सर्वच रोगांची मोफत तपासणी, औषधोपचार व आवश्यकतेनुसार मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. यावेळी महारक्तदान शिविरही होणार असून दिव्यांग, वयोवृद्ध व्यक्तींना मोफत साहित्य वाटप करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांचे आयुष्यमान भारत कार्ड काढण्यात येणार आहे. जास्तीत जास्त गरजुंनी या महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन उमरगा जनता बॅकचे चेअरमन तथा भाजपाचे युवा नेते शरण बसवराज पाटील यांनी
केले आहे.
शरण पाटील यांनी उमरगा येथे शनिवारी पत्रकार परिषद घेऊन या शिबिराची माहिती दिली. ते म्हणाले, मराठवाड्यातील जनतेच्या सक्षम आरोग्य सेवेसाठी ४ व ५ मार्चला महाआरोग्य शिबिर घेण्यात येत आहे. या शिबिरात आरोग्य तपासणी, औषधोपचारासह शस्त्रक्रियेपर्यंत सर्व सुविधा मोफत देण्यात येणार आहेत. मंगळवारी
(दि.४) स.१० ते सायं. ६ वाजेपर्यंत आदर्श महाविद्यालय, उमरगा येथे या शिबिराचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री भगवंत खुबा यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, माजी आ. ज्ञानराज चौगुले, जिल्हा बँकेचे चेअरमन बापुराव पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य यांची उपस्थिती
राहणार आहे. महाआरोग्य शिबिराच्या ठिकाणी दोन दिवस रुग्ण, त्यांचे नातेवाईक आदीसह सर्व उपस्थितांना चहा, नाष्टा व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. मराठवाड्यातील जास्तीत जास्त गरजूंनी या महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन उमरगा जनता बँकेचे चेअरमन तथा भाजपाचे युवा नेते शरण पाटील यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेला जि.प. माजी सदस्य रफीक तांबोळी, माजी सभापती सचिन पाटील, योगेश राठोड, दगडू पाटील, प्राचार्य डॉ. श्रीराम पेठकर, डॉ. शौकत पटेल, महेश माशाळकर, राजु मुल्ला आदी मान्यवर उपस्थित होते.