back to top
शुक्रवार, सप्टेंबर 26, 2025

Sai Baba Temple ; वनोली साईबाबा मंदिरात रविवारी महाप्रसादाचा कार्यक्रम पन्नास हजाराच्या वर भाविक उपस्थित राहण्याची शक्यता

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

यावल ( साक्षीदार न्युज ) ; – तालुक्यातील तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळालेल्या श्री साईबाबा देवस्थान वनोली तालुका यावल या मंदिरात सालाबादप्रमाणे नवरात्र उत्सवाची पूर्ण तयारी झालेली असून घटस्थापने नंतर अश्विन शुद्ध अष्टमी ही यावर्षी रविवार दिनांक 22 ऑक्टोबर 23 रोजी येत असून त्या दिवशी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला असून या कार्यक्रमाला राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार गिरीश भाऊ महाजन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील खासदार रक्षाताई खडसे हे विशेष उपस्थित राहणार असल्याचे या मंदिराचे विश्वस्त तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती हिरालाल भाऊ व्यंकट चौधरी यांनी

- Advertisement -

Sai Baba Temple

वनोली हे गाव भुसावळ फैजपूर रस्त्यावरील पाडळसे बामनोद गावापासून तीन किलोमीटर अंतरावर मध्ये आहे या ठिकाणी शंभू महादेवाची पिंडीची स्थापना व दोन नंदादीप श्री साईबाबांच्या हस्ते लावण्यात आलेले होते ते आजही तेवत आहेत एकीकडे दुष्काळ पडला त्यावेळी मंदिरात दिव्यांमध्ये तेल नव्हते दुष्काळ पडला होता साईबाबा महाराजांनी उघड्या डोळ्यांनी हे पाहिले त्यावेळी अक्षरशः साईबाबांनी दिव्यांमध्ये पाणी टाकून दिवा लावलेला दिसला असे गावकरी सांगतात 5 64 वर्षापासून आजही हे नंदादीप जळताना दिसतात या मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी आजपर्यंत युती शासन असताना तत्कालीन आमदार सुरेश दादा जैन व आमदार एकनाथ खडसे यांच्या माध्यमातून मोठा निधी मिळाला होता त्यानंतर खऱ्या अर्थाने या परिसराचा विकास होण्यामागे स्वर्गीय कृषी मित्र माजी आमदार तथा खासदार हरिभाऊ जावळे यांचे खरं प्रयत्न आहे त्यासोबतच जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर आप्पा सोनवणे स्वर्गीय खासदार वाय जी महाजन सर खासदार रक्षाताई खडसे आमदार शिरीष चौधरी यांनीही या मंदिराच्या जडणघडणीसाठी हातभार लावलेला आहे

Bank offer ; हि बँक देत आहे जेष्ठ नागरिकांना 400 दिवसांसाठी 8.15% पर्यंत व्याज देत आहे

- Advertisement -

दरवर्षी नवरात्र उत्सव हा पावसाळ्यात येत असतो मात्र यावर्षी अधिक श्रावण महिन्यामुळे एक महिना दसरा उशिराने आला त्यामुळे यावर्षी मोठ्या प्रमाणावर श्री साईबाबा महाराजांची महाप्रसादासाठी जळगाव जिल्हा भरातूनच नव्हे तर गुजरात मध्य प्रदेश राज्यातूनही लोक या ठिकाणी महाप्रसादाला येतात व येतील असा अंदाज विश्वस्तांनी व्यक्त केला आहे

घटस्थापनेनंतर अष्टमीच्या दिवशी वनोली कोसगाव या छोट्याशा गावांमध्ये जळगाव जिल्हा भरातून नातेवाईक साईबाबा चे दर्शनाला येतात श्रद्धेने या ठिकाणी गोडेतेल साईबाबाला वाहिले जात व काही भाविक या ठिकाणी आपल्या मुलांचे जाऊळही उतरवतात

22 ऑक्टोबर रविवार रोजी संध्याकाळी 40 ते 50 हजार भाविक महाप्रसादाला भेट देतील असा अंदाज आहे या महाप्रसादांमध्ये उडदाच्या डाळीचे वडे खीर गंगा फळ ची भाजी आणि पोळ्या या सर्वांसाठी साईबाबाच्या प्रांगणातच तयार केल्या जातात रात्री उशिरापर्यंत या महाप्रसादाची सांगता होते या कार्यक्रमाला यावल रावेर तालुक्याचे प्रांत अधिकारी तालुक्याचे तहसीलदार प्रशासकीय अधिकारी तलाठी ग्रामसेवक फैजपूर पोलीस स्टेशनचे संपूर्ण स्टाफ आरोग्य विभागाचे स्टाफ वीज मंडळाचे अधिकारी हे आपापले कामगिरी बजावतात

महाप्रसादानंतर दुसऱ्या दिवशी दिनांक 23 ऑक्टोबर सोमवार रोजी सकाळी साईबाबा मंदिराची यात्रा असते शंभर फूट उंच देवकाठी ही मोर नदीवर नेऊन धुतली जाते व तिथून तिला सजवून वाजत गाजत वाजंत्री च्या साह्याने गावात आणून मंदिरापर्यंत पोहोचवली जाते संध्याकाळी बारा गाड्या असतात व बारा गाड्या नंतर काही दोन लोकनाट्य ग्रामस्थांच्या करमणुकीसाठी ठेवले जातात

श्रीक्षेत्र वनोली साईबाबा मंदिराच्या महाप्रसादासाठी जळगाव जिल्हा भरातून भाविकांनी मोठ्या संख्येने शिस्तीने व शांततेने हजेरी लावावी व मंदिर प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन श्री साईबाबा मंदिर ट्रस्ट विश्वस्त तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती हिरालाल भाऊ चौधरीसह वनोली साईबाबा मंदिर चे भगत आत्माराम सपकाळे ग्रामस्थ आणि सरपंच उपसरपंच विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन व संचालक मंडळ आणि वनोली ग्रामस्थांनी आवाहन केले आहे

Sai Baba Temple

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Heavy Rain | “मुसळधार पावसाने घेतले 84 जीव! मृतांच्या...

Heavy Rain | साक्षीदार न्यूज | राज्यात अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर मानवहानी आणि संपत्तीचे नुकसान झाले असून, शासनाने तत्काळ मदतकार्य सुरू केले आहे....

Pandit Deendayal Upadhyay | पंडीत दीनदयाल उपाध्याय जयंती निमित्त...

Pandit Deendayal Upadhyay | साक्षीदार न्यूज | भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत महत्त्वाचा वाटा असणारे, एकात्मवाद व अंत्योदय विचारांचे प्रणेते "स्व.पंडित दीनदयाल उपाध्याय" यांच्या जयंती निमित्त...

Agriculture Officer | “शेतकऱ्यांचे संसार पाण्यात, मात्र कृषी अधिकारी...

Agriculture Officer | सुनिल भोळे | जळगाव जिल्ह्यात अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतीतील उभी पिके पाण्याखाली गेली, अनेकांच्या घरांचे नुकसान...

RECENT NEWS