Maharajswa Shibir | प्रशासन आले दारी! मेहरुणमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबीर’ संपन्न; भटक्या-विमुक्त कुटुंबांना मिळाला शासकीय योजनांचा ‘आधार’

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Maharajswa Shibir | जळगाव | शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा या उद्देशाने, जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली मेहरुण परिसरातील एल.एच. पाटील शाळेत ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ उत्साहात पार पडले. विशेषतः विमुक्त जाती व भटक्या जमातीतील बांधवांसाठी आयोजित या शिबिरात ओळखपत्र, विविध दाखले आणि प्रमाणपत्रे जागेवरच उपलब्ध करून देण्यात आली.

- Advertisement -

Maharajswa Shibir

वस्तीतील नागरिकांची कागदपत्रांची चिंता मिटली मेहरुण तलावाजवळील वस्तीत राहणाऱ्या नागरिकांना शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नये, यासाठी प्रशासनाने थेट वस्तीजवळ हे शिबीर भरवले होते. या मोहिमेत सुमारे ३६ कुटुंबांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शिबिरात १० स्वतंत्र कक्षांच्या माध्यमातून नागरिकांना मार्गदर्शन आणि तांत्रिक सहकार्य करण्यात आले.

- Advertisement -

प्रशासन नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर: प्रांताधिकारी विनय गोसावी “प्रशासन केवळ कार्यालयातून नाही तर प्रत्यक्ष मैदानात उतरून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे,” असे प्रतिपादन प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी प्रास्ताविकात केले. तांत्रिक त्रुटींमुळे कोणाचे काम थांबले असेल, तर पुन्हा शिबीर आयोजित करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

निराधार आणि दिव्यांगांना दिलासा संजय गांधी निराधार योजनेच्या तहसीलदार रुपाली काळे यांनी शासनाच्या आर्थिक मदतीबद्दल सविस्तर माहिती दिली. निराधार महिलांना दरमहा १५०० रुपये आणि दिव्यांग निराधारांना २५०० रुपये अनुदान दिले जात असल्याचे सांगत त्यांनी पात्र महिलांना नोंदणी करण्याचे आवाहन केले. या प्रसंगी मनपा आरोग्य अधिकारी, तलाठी आणि ‘अनुलोम’ संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Maharajswa Shibir

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Tribal Health Rights | प्रशासकीय अनास्थेचा ‘पोस्टमॉर्टम’! दोन वर्षांपासून...

Tribal Health Rights मालोदच्या आदिवासी बांधवांवर आरोग्य व्यवस्थेचा घाला? यावल । मिलिंद जंजाळे । तालुक्यातील मालोद परिसरातील आदिवासी बांधवांवर आरोग्य सुविधांच्या बाबतीत मोठा अन्याय होत असल्याची...

Yawal Rural Hospital | यावल ग्रामीण रुग्णालयात वर्षभरापासून एक्स-रे...

Yawal Rural Hospital | यावल | मिलिंद जंजाळे | येथील ग्रामीण रुग्णालयात गेल्या जवळपास एक वर्षापासून एक्स-रे मशीन बंद अवस्थेत असल्याने रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना...

Sanjay Gandhi Niradhar Yojana | यावल तालुक्यातील दिव्यांगांसाठी आनंदाची...

Sanjay Gandhi Niradhar Yojana |यावल | मिलिंद जंजाळे | यावल तालुक्यातील दिव्यांग नागरिकांसाठी दिलासादायक निर्णय घेत प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत...

RECENT NEWS