corruption |साक्षीदार न्यूज | भारतातील भ्रष्टाचाराबाबत धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या NCRB च्या ताज्या रिपोर्टनुसार देशात सर्वाधिक भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये महाराष्ट्र अव्वल ठरला आहे. २०२३ मध्ये देशभरात एकूण ११३९ भ्रष्टाचाराची प्रकरणे नोंदवली गेली असून, त्यातील तब्बल ७६३ प्रकरणे महाराष्ट्रात उघडकीस आली आहेत.
राज्यातील चित्रदेखील चिंताजनक आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक भ्रष्टाचार पुण्यात झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पुण्यात एकूण २८ प्रकरणे उजेडात आली असून, यामुळे पुणे हे राज्यातील “सर्वाधिक भ्रष्टाचार घडविणारे शहर” ठरले आहे. नागपूर आणि मुंबईसह काही मोठ्या शहरांतही भ्रष्टाचाराच्या घटना झाल्या आहेत.
दरम्यान, देशातील आत्महत्यांचे प्रमाणही वाढले आहे. NCRB आकडेवारीनुसार २०२३ मध्ये देशात तब्बल १,७१,४१८ लोकांनी आत्महत्या केल्या. यामध्ये सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. २०२२ च्या तुलनेत हा आकडा ०.३ टक्क्यांनी वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.
सरकारकडून भ्रष्टाचार रोखण्यासाठी विविध यंत्रणा सक्रिय केल्या असल्या, तरी मिळालेल्या आकडेवारीनुसार परिस्थितीत सुधारणा न होता ती अधिक गंभीर होत चालल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.