Agriculture News | या तारखेपर्यंत राज्यात पुन्हा ‘संपूर्ण कर्जमाफी’चा मोठा निर्णय! कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Agriculture News | साक्षीदार न्यूज | राज्यातील शेतकऱ्यांना २०१७ मध्ये दीड लाख रुपयांपर्यंत, तर २०१९ मध्ये दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात आली होती. मात्र ही रक्कम मर्यादित असल्यामुळे अनेक शेतकरी या योजनांच्या लाभापासून वंचित राहिले होते. आता मात्र राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेत संपूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यासाठी सहकार विभागाकडून जिल्हानिहाय माहिती मागविण्यात आली आहे. या प्रक्रियेवर अभ्यास करण्यासाठी प्रविणसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष अभ्यास समिती नेमण्यात आली आहे. ही समिती एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपला अहवाल राज्य सरकारकडे सादर करणार आहे.

अहवाल प्राप्त झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार अंतिम निर्णय घेणार असून, ३० जूनपूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ देण्याचा मानस सरकारचा असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.

- Advertisement -

या घोषणेमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, सध्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांमध्ये नव्या आशेचे वातावरण निर्माण झाले आहे

राज्यातील शेतकऱ्यांना ३० जूनपूर्वी संपूर्ण कर्जमाफी दिली जाणार असल्याची घोषणा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली आहे. जिल्हानिहाय माहिती संकलन सुरू.

Agriculture News

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Hindu Muslim Unity | साकळीतील ईद मिलाद सोहळ्यात हिंदू-मुस्लिम...

Hindu Muslim Unity यावल | मिलिंद जंजाळे | साकळी (बऱ्हाणपूर–अंकलेश्वर रोड) येथे मेश ऍग्रो कंपनीतर्फे आयोजित करण्यात आलेला ईद मिलाद सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात आणि...

Kingaon PHC | किनगावात गरोदर मातांच्या जीवाशी खेळ; एकाच...

Kingaon PHC किनगाव | मिलिंद जंजाळे | एकीकडे सरकार 'सुरक्षित मातृत्व' आणि 'डिजिटल इंडिया'च्या गप्पा मारत असताना, जळगाव जिल्ह्यातील किनगाव येथे मात्र मानवतेला काळिमा...

Jalgaon Banana Price | केळी दरात मोठी घसरण! जळगावातील...

Jalgaon Banana Price जळगाव | मिलिंद जंजाळे | जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी सध्या गंभीर आर्थिक अडचणीत सापडले असून, बाजारात मिळणाऱ्या अत्यल्प दरामुळे नाराजी वाढत...

RECENT NEWS