heavy rains | अतिवृष्टीग्रस्तांसाठी महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचा मदतीचा हात!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

heavy rains मुख्यमंत्री सहाय्यता निधीत तब्बल एकावन्न लाखांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे सुपूर्त

- Advertisement -

heavy rains जळगाव । साक्षीदार न्यूज । राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सामाजिक बांधिलकी जपत दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये तब्बल ₹51,00,000 (एकावन्न लाख रुपये) इतक्या देणगीचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे सुपूर्त करण्यात आला.

या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन उपस्थित होते.

- Advertisement -

फेडरेशनचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे आणि उपाध्यक्ष रोहित निकम यांनी हा धनादेश मुख्यमंत्री फडणवीस यांना सुपूर्त केला.या वेळी संचालक रमेश हिंगणकर, पांडुरंग घुगे, नितीन हिवसे, बळवंतराव पाटील, अशोक हटकर, भागवत दास तसेच व्यवस्थापकीय संचालक श्रीधर दुबे पाटील उपस्थित होते.

या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेडरेशनच्या सामाजिक योगदानाचे कौतुक करत संस्थेचे आभार मानले. त्यांनी म्हटले की, “सहकार क्षेत्रातील संस्थांकडून मिळणारा हा हातभार अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी मोठा आधार ठरेल.”

यावेळी फेडरेशनचे उपाध्यक्ष रोहित निकम म्हणाले,
“शेतकऱ्यांचे दुःख हे आपल्या समाजाचे दुःख आहे. सहकार क्षेत्रातून समाजासाठी काहीतरी करण्याची परंपरा आपण जपली पाहिजे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळावा, हीच आमची भावना आहे.”

राज्यातील सहकार क्षेत्र सामाजिक जबाबदारी पार पाडत असल्याचे हे उत्तम उदाहरण असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

heavy rains

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Sand Mafia Jalgaon | वाळू माफियांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका! शिरसोली-कुऱ्हाडदा...

Sand Mafia Jalgaon जळगाव | सुनिल भोळे | शिरसोली ते कुऱ्हाडदा दरम्यान रात्रीच्या सुमारास चालणाऱ्या बेफाम अवैध वाळू वाहतुकीला लगाम घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर...

Adawad Gram Panchaya | अडावद ग्रामपंचायतीत निधी घोटाळ्याचे आरोप;...

Adawad Gram Panchaya यावल | मिलिंद जंजाळे | अडावद ग्रामपंचायतीत १५ वा वित्त आयोग निधीअंतर्गत राबविण्यात आलेल्या ई-निविदा प्रक्रियेवरून वाद निर्माण झाला असून ग्रामपंचायत...

Government Scheme | धरणातील गाळ आता शेतात! आमदार अमोलभाऊ...

Government Scheme रावेर-यावल |  मिलिंद जंजाळे | मतदारसंघात सन २०२६-२७ साठी ‘गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार’ योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या पुढाकारातून...

RECENT NEWS