Maharashtra State Senior Championship |३५ व्या महाराष्ट्र राज्य वरिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेत जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या निकिता पवारला सुवर्णपदक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Maharashtra State Senior Championship | जळगाव | लातुर येथे ३५ व्या महाराष्ट्र राज्य वरिष्ठ पुरुष व महिला अजिंक्यपद स्पर्धा ५ ते ७ डिसेंबर दरम्यान पार पडली. यामध्ये जैन स्पोर्टस् अकॅडमी च्या निकिता दिलीप पवार ने सुवर्णपदक प्राप्त केले.

- Advertisement -

या स्पर्धेत जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन तथा जैन स्पोर्टस् अकॅडमीची राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती कु. निकिता दिलीप पवार हिने पुन्हा एकदा आपलं वर्चस्व प्रस्थापित करुन महिलांच्या ५७ किलो आतिल वजन गटात सुवर्णपदक पटकाविले. या यशामुळे हैदराबाद येथे होणार असलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघात तिचे स्थान निश्चित झाले आहे. तिने पहिल्या फेरीत ठाणे, दुसऱ्या फेरीत कोल्हापूर तर अंतिम फेरीत पुणे ची खेळाडू श्रद्धा वाल्हेकर हिला नमवत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. निकिता चे या वर्षांतील राज्य स्पर्धेतील लागोपाठ तिसरं सुवर्णपदक आहे, तर राष्ट्रीय स्पर्धेत एक सुवर्णपदक एक कांस्यपदक तिने पटकाविले.स्पर्धेत सर्वात्कृष्ट खेळाडू म्हणून बेस्ट फायटर पुरस्काराने तिला सन्मानित करण्यात आले. तिला प्रशिक्षक जयेश बाविस्कर, अजित घारगे यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे अध्यक्ष तथा जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, उपाध्यक्ष ललित पाटील, खजिनदार सुरेश खैरनार, सचिव अजित घारगे, सहसचिव रविंद्र धर्माधिकारी, सदस्य नरेंद्र महाजन, कृष्णकुमार तायडे, महेश घारगे, सौरभ चौबे तसेच जैन स्पोर्टस् अकॅडमी चे अरविंद देशपांडे यांनी कौतुक केले आहे.

Maharashtra State Senior Championship

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS