Maharashtra Zilla Parishad election 2026 | नव्या वर्षात झेडपी निवडणुकांचा बिगुल वाजणार ! महाराष्ट्रात दोन टप्प्यांत बार उडणार, संभाव्य कार्यक्रम जाहीर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Maharashtra Zilla Parishad election 2026 | साक्षीदार न्यूज |नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राज्यातील राहिलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा बिगुल वाजण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, निवडणूक यंत्रणा सज्ज झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

- Advertisement -

आरक्षणाच्या तिढ्यामुळे या निवडणुका दोन टप्प्यांत घेण्याचा विचार सुरू आहे. राज्यातील एकूण ३२ जिल्हा परिषदांपैकी पहिल्या टप्प्यात १२ जिल्हा परिषद आणि ३३६ पैकी १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्याचा आयोगाचा मानस असल्याचे समजते. या निवडणुकांचा संपूर्ण कार्यक्रम सुमारे २१ दिवसांत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची दाट शक्यता असून, ८ जानेवारीपूर्वी संबंधित जिल्ह्यांमध्ये आचारसंहिता लागू होऊ शकते. त्यामुळे राजकीय पक्षांनी आतापासूनच तयारीला वेग दिल्याचे चित्र आहे.

- Advertisement -

दरम्यान, Supreme Court of India ने राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ३१ जानेवारी २०२६ पर्यंतची मुदत दिली आहे. मात्र, काही जिल्ह्यांमध्ये आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा जास्त असल्यामुळे सध्या २० जिल्हा परिषद आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका स्थगित ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यात मर्यादित जिल्ह्यांमध्येच निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पहिल्या टप्प्यात ५० टक्के आरक्षण मर्यादेचे पालन झालेल्या जिल्ह्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे. या टप्प्यात सोलापूर,रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग,पुणे,सातारा,सांगली,कोलीहापूर,छत्रपती संभाजीनगर,परभणी,धाराशिव  आणि लातूर या जिल्ह्यांचा समावेश असल्याची चर्चा आहे.

उर्वरित २० जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका आरक्षणासंदर्भातील अडचणी दूर झाल्यानंतर, म्हणजेच ३१ जानेवारीनंतर घेण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले असून, येत्या काही दिवसांत निवडणूक कार्यक्रमाबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 सोन्याच्या दरांनी पुन्हा विक्रम मोडला आहे. 24K, 22K, 18K सोन्याचे आजचे दर मुंबई, पुणे, जळगावसह देशभरात किती आहेत? सविस्तर माहिती…
जागा वाटपावरून शिवसेना युतीमधून बाहेर पडणार का ? शिंदे गटाने दिला अल्टिमेटम
“रुग्णवाहिका अडकली, पोलीस निघून गेले! निवृत्त पोलिसांनीच वाचवला खॉजामिया चौक”
अजित दादा भाजप बरोबर नाही

Maharashtra Zilla Parishad election 2026

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Blood Donation Camp | वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! सारिका ताई...

Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान...

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

RECENT NEWS