महर्षी वाल्मिकी नगर, मालुसरे नगर, जैनाबाद आ. राजूमामांच्या स्वागतासाठी सजले..!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

रांगोळ्या,फुले,पाकळ्यांच्या वर्षावात औक्षणासाठी महिलांच्या रांगा..!

- Advertisement -

राजूमामांवरील प्रेमवर्षाव कमी होण्याचे नाव घेईना, शहरात सर्वत्र जोरदार प्रतिसाद

जळगाव (सुनिल भोळे) : – शुक्रवारी प्रचारातील पहिल्या टप्प्यात महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांच्या स्वागतासाठी शहरातील महर्षी वाल्मिकी नगर, मालुसरे नगर, जैनाबाद, मेस्कोमाता नगर सजल्याचे चित्र सकाळी दिसून आले. गल्लीबोळात रांगोळ्या,फुले,पाकळ्यांच्या वर्षावात महिलांच्या औक्षणासाठी रांगा लागल्या होत्या. प्रत्येक भगिनी, भाचीचा ओवाळण्याचा हट्ट आ.राजूमामांनी पुरविला. लहान मुले, तरुण, महिला सर्वच वर्गातील नागरिकांचा एवढ्या मोठ्या प्रमाणावरील प्रेमवर्षाव पाहून आ. भोळेंना आनंदाश्रू आवरता आले नाही.

- Advertisement -

Maharishi Valmiki Nagar

शुक्रवारी दि. १५ रोजी पहिल्या टप्प्यात महर्षी वाल्मिक मंदिर येथे अभिवादन करून आ. राजूमामा भोळेंनी प्रचाराला सुरुवात केली. तेथून महर्षी वाल्मिक नगर, जैनाबाद, तानाजी मालुसरे नगर, दिनकर नगर, गुरुदत्त कॉलनी, मेस्को माता नगर परिसर, श्रीराम कॉलनी, दशरथ नगर, तळेले कॉलनी मार्गे माजी नगरसेविका रंजना भरत सपकाळे यांच्या घराजवळ समारोप झाला. रॅली मार्गात सर्व कष्टकरी, श्रमीक वर्गातील नागरिकांनी आ. भोळेंचे स्वागत करून त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. प्रसंगी विविध मान्यवरांच्या घरी आ. राजूमामा भोळे यांनी भेट दिली.

Maharishi Valmiki Nagar

रॅलीत भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, जिल्हा उपाध्यक्ष नितीन इंगळे, विधानसभा क्षेत्र प्रमुख विशाल त्रिपाठी, शिवसेनेचे महानगर संघटक ॲड. दिलीप पोकळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे प्रदेश संघटक विनोद देशमुख, लोक जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दीपक सपकाळे, जिल्हाध्यक्ष अशोक पारधे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजूभाई मोरे, रिपाई (आठवले) गटाचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, भाजपचे माजी महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, माजी नगरसेवक कैलास सोनवणे, कांचन सोनवणे, भारती सोनवणे, रंजना सपकाळे, भाजप मंडळ क्रमांक २ चे अध्यक्ष राहुल घोरपडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला महानगराध्यक्ष मीनल पाटील, भाजपचे गीतांजली ठाकरे, निलेश तायडे, शुभम तायडे, शालिक सपकाळे, भरत कोळी, जिभाऊ वानखेडे, जयेश भावसार, सागर पाटील, गणेश बाविस्कर, अजय सोनवणे, आकाश इंगळे, आकाश रायसिंगे, अनिल पाटील, चेतन कोळी, पंकज सोनवणे, मनोज रायसिंगे, मीना बाविस्कर, वैशाली बाविस्कर, वैशाली पाटील, ॲड. शारदा सोनवणे, दीपक कोळी, चेतन शर्मा, अनिता राणे, रेखा कुलकर्णी, कल्पेश सोनवणे, शिवसेनेचे उमेश सोनवणे, पुष्पा तळेले, सुषमा चौधरी, आरती नाईक, भारती रंधे, नीला पवार, ममता जंजाळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक लता मोरे, अर्चना कदम, ममता तडवी, शोभा भोईटे, रिपाई (आठवले) गटाचे युवा जिल्हाध्यक्ष मिलिंद सोनवणे, अविनाश पारधे, अक्षय मेघे, लोक जनशक्ती पक्षाचे मनोज निकम, आनंदा सोनवणे आदी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Maharishi Valmiki Nagar

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Yawal News | यावलमध्ये पाण्यासाठी महिलांचा आक्रोश! ५ किमीवरून...

Yawal News यावल |  मिलिंद जंजाळे| तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, वॉर्ड क्रमांक १, दुसरखेडा रेल्वे स्टेशन परिसरात गेल्या काही वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र...

Gold Price | सोन्याच्या दरात मोठी घसरण! अजून किती...

Gold Price | साक्षीदार न्यूज | मार्च महिन्यात सोन्या आणि चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय घसरण नोंदवली गेली असून गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. Kedia...

Hindu Muslim Unity | साकळीतील ईद मिलाद सोहळ्यात हिंदू-मुस्लिम...

Hindu Muslim Unity यावल | मिलिंद जंजाळे | साकळी (बऱ्हाणपूर–अंकलेश्वर रोड) येथे मेश ऍग्रो कंपनीतर्फे आयोजित करण्यात आलेला ईद मिलाद सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात आणि...

RECENT NEWS