back to top
बुधवार, एप्रिल 30, 2025

Mahavikas Aghadi Karandada Patil ; महाविकास आघाडीचे उमेदवार करणदादा पाटील यांचे शिरसोली, चिंचोली, धानवड येथे जोरदार स्वागत

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mahavikas Aghadi Karandada Patil विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांच्या घेतल्या भेटी

- Advertisement -

जळगाव ( साक्षीदार न्युज ) : – महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील यांच्या प्रचाराला सुरूवात झाली असून शुक्रवार दि. २६ रोजी जळगाव तालुक्यात शिरसोली, चिंचोली, धानवड आदी गावांमध्ये प्रचार रॅली काढण्यात आली. सर्वच गावांमध्ये करणदादा पाटील यांचे फटाक्यांची आतषबाजी करून जोरदार स्वागत करण्यात आले.

Mahavikas Aghadi Karandada Patil

- Advertisement -

शिरसोली येथे श्री गणेश व हेमाडपंथी दक्षेश्वर महादेव मंदिरात जाऊन पूजाअर्चा करून प्रचाराला प्रारंभ करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी करणदादा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, महाविकास आघाडीचा विजय असो, अशा विविध घोषणा देऊन करणदादा पवार यांना विजयी करण्याचे आवाहन केले. गावात ठिकठिकाणी औक्षण करून करणदादा पवार यांचे स्वागत करण्यात आले. रॅली दरम्यान करणदादा पाटील यांनी नागरिकांशी संवाद साधला.

Mahavikas Aghadi Karandada Patil

चिंचोली येथेही फटाक्यांची आतषबाजी आणि औक्षण करून स्वागत करण्यात आले. त्यानंतर गावतील विविध भागात जावून मशाल चिन्हाला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. रॅली दरम्यान माजी सरपंच शरद घुगे, जंगलू देवबा लाड यांच्या घरी भेट दिली.

धानवड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर प्रचाराला सुरुवात करण्यात आली. गावातील तरुणांनी स्वयंस्फुर्तीने रॅलीत सहभागी होवून करणदादा पाटील यांचे ठिकठिकाणीपुष्गुच्छ देवून स्वागत केले.

Mahavikas Aghadi Karandada Patil

रॅलीत माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेनाचे तालुकाप्रमुख उमेश पाटील, युवासेना धरणगाव तालुकाप्रमुख निलेश चौधरी, बाजार समितीचे माजी सभापती लक्ष्मण पाटील, काँग्रेस तालुका अध्यक्ष मनोज चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक डॉ. अरुण पाटील, योगराज सपकाळे, धानवडचे उपसरपंच दिलीप चव्हाण, हेमंत पाटील, धवल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस संजय चव्हाण, तालुकाध्यक्ष मनोज चौधरी, उपाध्यक्ष रवी सोनवणे, सरचिटणीस मुरली सपकाळे, संदीप वाघ, रवींद्र चौधरी, सुभाष भंगाळे, बापू परदेशी, शिरसोली प्र.न.चे सरपंच हिलाल मल्हारी भिल्ल, उपसरपंच शशिकांत अस्वार, शिरसोली प्र.बो. चे सरपंच पती अर्जुन पवार, उपसरपंच समाधान जाधव, शिरसोली प्र.बो. ग्रामपंचायत सदस्य डिगंबर बारी, अर्जुन पवार, प्रदिप पाटील, रईस शेख, राजेंद्र बारी, प्रदिप खलसे, ईश्वर कोळी, जिल्हा उप संघटक विकास चौधरी, तालुका समन्वयक ठाकरे गट विजय लाड, युवा सेना उपजिल्हा प्रमुख अविनाश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुका उपाध्यक्ष शुभम लाड, ग्रामपंचायत सदस्य विनोद बारी, गौतम खैरे, मिठाराम पाटील, भगवान बोबडे, एकनाथ सोनवणे, उत्तम अस्वार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवक जिल्हा सरचिटणीस भुषण पाटील, गोलु पवार, समाधान निकुंभ, शिवसेना तालुका संघटक बबन धनगर, धानवडचे अविनाश पाटील, भाऊसाहेब सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुका युवक उपाध्यक्ष विशाल पालवे,मयुर घुगे, पन्नालाल घुगे, सचिन धुमाळ, राकेश घुगे, योगेश अस्वार, ज्ञानेश्वर पाटील, भगवान पाटील, पंढरी पाटील यांसह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.

Mahavikas Aghadi Karandada Patil

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Kashmir Terror Attack | काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ल्याचा धोका;...

Kashmir Terror Attack  साक्षीदार न्युज | श्रीनगर, ३० एप्रिल २०२५ | पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीर खोऱ्यात पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. गुप्तचर...

ATM Withdrawal Charges | 1 मे 2025 पासून ATM...

ATM Withdrawal Charges साक्षीदार न्युज । सुनिल भोळे ।  1 मे 2025 पासून ATM मधून पैसे काढणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने...

Jalgaon Municipal Office | जळगावात मनपा संबंधित अधिकारी रस्त्यावर...

Jalgaon Municipal Office साक्षीदार न्युज । सुनिल भोळे ।  जळगाव शहरातील मनपा संबंधित एक अधिकाऱ्याला मद्यधुंद अवस्थेत हॉटेलमधून बाहेर आधार देत दुचाकीवर बसविण्यात आले....

RECENT NEWS