Mahayuti Corporation Election | जागा वाटपावरून शिवसेना युतीमधून बाहेर पडणार का ? शिंदे गटाने दिला अल्टिमेटम

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Mahayuti Corporation Election | साक्षीदार न्यूज | महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील घटक पक्षांमध्ये जागावाटपावरून मतभेद तीव्र झाले असून, पुणे आणि नाशिक महापालिकेतील तिढा अद्याप सुटलेला नाही. भाजप आणि शिवसेना यांच्यातील चर्चांच्या अनेक फेऱ्या होऊनही अंतिम तोडगा न निघाल्याने राजकीय वर्तुळात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

- Advertisement -

पुणे आणि नाशिकमध्ये भाजप–शिवसेना युतीतून निवडणूक लढवण्याबाबत प्राथमिक सहमती असली, तरी जागावाटपाच्या मुद्द्यावर दोन्ही पक्ष आमनेसामने आले आहेत. शिवसेनेकडून सन्मानजनक जागांची ठाम मागणी करण्यात येत असून, भाजपकडून अद्याप स्पष्ट भूमिका मांडण्यात आलेली नाही.

बुधवारी दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये जवळपास दहा तास चर्चा झाली. मात्र, या बैठकीतही पुणे आणि नाशिक महापालिकेच्या जागावाटपाचा प्रश्न अनिर्णितच राहिला. नाशिकमध्ये भाजपकडून २५ ते ३० जागांची ऑफर देण्यात आल्याची चर्चा असली, तरी त्यावर शिवसेनेच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्याचं समजतं. यामध्ये हेमंत गोडसे यांच्यासह अनेक नेत्यांनी आक्षेप नोंदवला.

- Advertisement -

पुण्याच्या बाबतीतही चित्र वेगळं नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर स्थानिक पातळीवर बैठका झाल्या, तरी शिवसेनेला अपेक्षित सन्मानजनक वाटा मिळत नसल्याची भावना पक्षात आहे. याबाबत शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट इशारा दिला आहे. भाजपकडून लवकरच ठोस उत्तर न आल्यास शिवसेना ‘योग्य निर्णय’ घेईल, असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, भाजप शिवसेनेला पुण्यात सुमारे २५ जागा देण्यास तयार असल्याची चर्चा होती. मात्र, प्रत्यक्षात भाजप फक्त १५ जागांवर ठाम असल्याची माहिती समोर येत आहे. दुसरीकडे, शिवसेनेने तब्बल ३५ जागांची मागणी केल्यामुळे दोन्ही पक्षांतील अंतर अधिकच वाढलं आहे.

महत्त्वाचं म्हणजे, पुणे महापालिका निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) स्वबळावर लढणार असल्याचं यापूर्वीच जाहीर करण्यात आलं होतं. तरीसुद्धा भाजप–शिवसेना युती कायम राहील, असंही सांगण्यात आलं होतं. मात्र जागावाटपाचा प्रश्न मार्गी न लागल्यास शिवसेना युतीतून बाहेर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या संपूर्ण प्रकरणावर अंतिम निर्णय शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे घेतील, असं नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे उद्यापर्यंत भाजपकडून सकारात्मक संकेत मिळतात का, याकडे संपूर्ण राजकीय महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

जळगाव विमानतळावर बॉम्बची धमकी! क्षणात सुरक्षा यंत्रणा अलर्ट, नेमकं काय घडलं?
बोदवड शहरातील अवैध देशीदारू वाईन शॉप यांना…
31 डिसेंबरसाठी घरीच दारूची पार्टी करता तर…
गर्भवती महिलांनी शिवलिंगाची पूजा करावी का? शास्त्र…

Mahayuti Corporation Election

 

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Kingaon PHC | किनगावात गरोदर मातांच्या जीवाशी खेळ; एकाच...

Kingaon PHC किनगाव | मिलिंद जंजाळे | एकीकडे सरकार 'सुरक्षित मातृत्व' आणि 'डिजिटल इंडिया'च्या गप्पा मारत असताना, जळगाव जिल्ह्यातील किनगाव येथे मात्र मानवतेला काळिमा...

Jalgaon Banana Price | केळी दरात मोठी घसरण! जळगावातील...

Jalgaon Banana Price जळगाव | मिलिंद जंजाळे | जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी सध्या गंभीर आर्थिक अडचणीत सापडले असून, बाजारात मिळणाऱ्या अत्यल्प दरामुळे नाराजी वाढत...

Rural Hospital Issue | किनगावमध्ये आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा! पीएम...

Rural Hospital Issue यावल | मिलिंद जंजाळे | तालुक्यातील किनगाव येथे आरोग्य व्यवस्थेची गंभीर अवस्था समोर आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात जागेअभावी रुग्णांची तपासणी...

RECENT NEWS