महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांच्या प्रचाराचा झंजावात
मतदारांनी दिली स्मिताताई वाघ यांच्या विजयाची ग्वाही
जळगाव (साक्षीदार न्यूज) : एरंडोल तालुक्यात जळगाव लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांच्या प्रचारात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) , रिपाइं (आठवले) चे पदाधिकारी व कार्यकर्त्यानी प्रचारफेरी काढली.
एरंडोल तालुक्यातील उत्राण, तळई, निपाणे, आडगाव, अंतुर्ली, जवखेडा सिम या गावात निघालेल्या प्रचार फेरीत शेतकरी,कामगार व महिला व युवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेवून मतदारांशी संवाद साधला.प्रचारादरम्यान गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेत, त्यांच्या समस्या लवकरात लवकर निराकरण करण्याचे अभिवचन महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी मतदारांना दिले.

यावेळी गरीब कुटुंबांना मोफत धान्य, शेतकऱ्यांना आर्थिक मदत, दवाखान्यातील उपचारासाठी ५ लाखांची तरतूद यामुळे मतदार भाजपाच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे दिसत होते.
“पुन्हा एकदा मोदी सरकार” असा निर्धार एरंडोल तालुक्यातील मतदारांनी केल्याचे आज निघालेल्या प्रचार फेरीत दिसून आले.
यावेळी अमोलदादा चिमणराव पाटील, माजी खा. ए. टी . नाना पाटील, डॉ. संभाजी पाटील, राजेंद्र पाटील, ज्ञानेश्वरभाऊ आमले, वासुदेव पाटील, एस. आर. पाटील, नरेंद्र पाटील, अनिल महाजन, नाना देमले, मच्छिन्द्र पाटील, उज्वलाताई पाटील, ज्ञानोआबा पाटील, ज्ञानेश्वर भाऊ कंखरे, नरेश ठाकरे, अनुपदादा पवार, ऋषिकेष पाटील, जितेंद्र चौधरी, दगडू आण्णा चौधरी, बाजीराव पांढरे, कमलेश पाटील, गौरव पाटील, मिलिंद मोरे, छोटू भाऊ क्षीरसागर, भूषण पाटील यांसोबत महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.








