महायुती सरकारने थांबवलेली अनेक विकास कामे पूर्ण करणार – धनंजय चौधरी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

रावेर (सुनिल भोळे) : – रावेर यावल विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी(शरदचंद्र पवार पक्ष) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार धनंजय चौधरी यांच्या प्रचाराने आता वेग धरला आहे. आज (दि.१५) रावेर तालुक्यातील चोरवड – अजनाड – मोरगाव बु. मोरगाव खु. वाघोड या गावांना भेटी देत त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.

- Advertisement -

government - Dhananjay Chaudhary

यावेळी ते म्हणाले की, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने व महाविकास आघाडीच्या जेष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून ही निवडणूक लढवत आहे. मतदारसंघातील शेतकरी, कष्टकरी, महिला आणि युवकांचे प्रश्न विधिमंडळात मांडून त्यांची सोडवणूक करण्यासाठी, तसेच रावेर यावल विधानसभा मतदारसंघाचा शाश्वत विकास साधण्यासाठी हाताचा पंजा या चिन्हासमोरील बटण दाबून मतदानरूपी आशीर्वाद द्यावा.

- Advertisement -

government - Dhananjay Chaudhary

गेले अनेक वर्षे मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना लोकसेवक मधुकरराव चौधरी व आमदार शिरीषदादा चौधरी यांनी केलेला सर्वांगीण विकास आणि त्यांचा विकासाचा वसा, वारसा अखंडितपणे पुढे चालवण्याची आम्ही ग्रामस्थांना ग्वाही दिली. रावेर पूर्व भागातील गावांनी नेहमी आमच्या चौधरी परिवारावर प्रेम आणि मतदानरुपी आशीर्वाद दिलेला आहे आमदार शिरीषदादा चौधरी यांनी चोरवड येथे व्यायाम शाळेला वॉल कंपाउंड सुरेश नागराज पाटील यांच्या घरापासून ते रमेश नागराज पाटील यांच्या घरापर्यंत पेव्हर ब्लॉक मोरगाव बु येथे ग्रामपंचायत इमारत बांधकाम,वाघोड येथे ग्रामपंचायत इमारत बांधकाम स्मशानभूमीकडे जाणारा रोड डांबरीकरण करणे तसेच अटवाडा ते अजनाड रस्ता डांबरी करण तसेच विविध गावा अंतर्गत काँक्रीटीकरण पेव्हर ब्लॉकची कामे झालेली आहेत. महायुतीच्या सरकारमुळे अडीच वर्षात अनेक कामे थांबवली गेली. त्यामुळे निश्चितचं काही कामे राहून गेली आहेत. ती कामे पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे ते नक्की पूर्ण करू असे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले. यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

government - Dhananjay Chaudhary

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Blood Donation Camp | वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! सारिका ताई...

Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान...

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

RECENT NEWS