Mahindra New SUV Launch | महिंद्राची नवी धमाका एंट्री! XUV 7XO चे नाव जाहीर; 5 जानेवारीला उघड होणार ‘उद्याची SUV’

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Mahindra New SUV Launch | साक्षीदार न्यूज |भारताची अग्रगण्य SUV निर्माती महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी आपल्या पुढील पिढीतील प्रीमियम SUV ला XUV 7XO हे नाव देत औपचारिक घोषणा केली आहे. येत्या 5 जानेवारी 2026 रोजी या मॉडेलचा वर्ल्ड प्रीमियर होणार असून, ऑटोमोबाईल क्षेत्राचे लक्ष या SUV कडे वेधले गेले आहे.

- Advertisement -

गेल्या चार वर्षांत महिंद्राच्या XUV700 ने भारतीय बाजारात तब्बल 3 लाखांहून अधिक ग्राहकांचा विश्वास जिंकत SUV सेगमेंटमध्ये नवा बेंचमार्क निर्माण केला. याच यशाची पुढील पायरी मानली जाणारी XUV 7XO अधिक आकर्षक डिझाइन, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सुधारित कामगिरीसह बाजारात उतरणार आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या नवीन SUV मध्ये डिझाईन, इंजिनिअरिंग, कम्फर्ट आणि परफॉर्मन्स या सर्व विभागांमध्ये लक्षणीय बदल करण्यात आले आहेत. XUV700 वर आधारित प्लॅटफॉर्म असूनही, XUV 7XO ही केवळ अपग्रेड नसून पूर्णपणे नवीन प्रीमियम अनुभव देणारे वाहन असेल, असा दावा महिंद्राने केला आहे.

- Advertisement -

प्रीमियम SUV श्रेणीत आपली पकड आणखी मजबूत करण्याच्या उद्देशाने विकसित केलेली XUV 7XO, भारतीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारातही ‘उद्याची SUV’ म्हणून नवा ट्रेंड निर्माण करण्यास सज्ज आहे.

Mahindra New SUV Launch

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS