back to top
गुरूवार, ऑगस्ट 21, 2025

चेहरा टवटवीत दिसण्यासाठी घरीच बनवा ‘फेसपॅक’

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

साक्षीदार | २२ नोव्हेबर २०२३ | सध्या राज्यात हिवाळा सुरु आहे, त्यामुळे अनेकांना आरोग्याबाबत त्रास होत असल्याने अनेक महिला घरीच विविध उपाय करून आरोग्य उत्तम ठेवत असतात त्यात त्वचेला उजाळा देणारे, त्वचेचा तेलकटपणा कमी करणारे, त्वचेवरील डाग, काळेपणा कमी करण्यास उपयोगी ठरणारे आणि त्वचेचा कस वाढविणारे असे अनेक पॅक किंवा लेप फार वेळ वाया न घालविता घरच्या घरी तयार करता येतात. असे लेप चेहर्‍यावर लावल्याने, लेप आणि त्वचा यांच्यादरम्यान निर्वात पोकळीने त्वचेचा बाहेरील भाग थोडा खेचला जातो. त्यामुळे त्वचेलगतचे रक्ताभिसरण वेगाने होऊ लागते आणि त्वचेला पोषक द्रव्यांचा अन्नपुरवठा होऊन त्वचा टवटवीत आणि ताजी दिसू लागते.

- Advertisement -

सौंदर्यसाधनासाठी मध हा बहुगुणी आहे. 1 चमचा मध आणि 1 चमचा दुधावरील साय या मिश्रणाने त्वचेवरील कोरडेपणा आणि त्यामुळे निर्माण झालेल्या सुरकुत्या नाहीशा होतात. एक चमचा लिंबाचा रस आणि दोन चमचे मध हे मिश्रण तर निस्तेज त्वचेत बदल घडवून आणते. मक्याच्या दुधात ‘अ’ व ‘ड’ ही जीवनसत्त्वे असतात. त्याचाही पॅक म्हणून उपयोग होतो.

सौंदर्यवतींची सर्वांत आवडती वस्तू म्हणजे बदाम, खसखस. यांच्या वाटलेल्या मिश्रणात भरपूर तेल आणि प्रथिने असतात. दुधात या पावडरींचे समप्रमाणात मिश्रण बनवून लेप लावावा. सर्व वयांतील स्त्रियांसाठी जीवनसत्त्वदायक असा हा पॅक आहे. चेहर्‍यासाठी मक्याचे पीठ, मेथ्यांचे पीठ, ओटचे पीठ यांचाही वापर करता येतो. या पिठात अर्धा चमचा लिंबाचा रस किंवा लिंबे, संत्री, मोसंबी यांच्या साली वाळवून त्यांची भुकटी करून, यांची पेस्ट होईल इतके पाणी घालून पॅक तयार करावा.

- Advertisement -

डोळे आणि ओठ सोडून चेहरा, मान या भागावर लावून 10 ते 15 मिनिटांनी काढावा. यातून ‘क’ जीवनसत्त्व मिळते. त्वचा तजेलदार दिसण्यासाठी ‘अ’, ‘ड’, ‘क’ ही जीवनसत्त्वे महत्त्वाची आहेत. आंबेहळद, जायफळ दुधात किंवा लिंबाच्या रसात उगाळून हा लेप करावा. हा लेप रक्तशुद्धी करणारा आहे. त्वचेवरील काळसरपणा किंवा डाग घालवण्यासाठीही फायदेशीर ठरतो.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Big News Ration Card | केंद्राचा मोठा निर्णय: 1.17...

Big News Ration Card | साक्षीदार न्यूज  | केंद्र सरकारने राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कायद्यांतर्गत (NFSA) स्वस्त धान्य योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे 1.17 कोटी रेशनकार्डधारकांना...

Domestic Violence | यावल येथे कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार; पाच...

Domestic Violence | साक्षीदार न्यूज | यावल येथील पोलीस ठाण्यात एका महिलेने आपले पती, सासू, जेठ, जेठाणी आणि नणंद यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठी...

Electric shock | वरखेडी गावात करंट लागल्याने पाच जणांचा...

Electric shock एरंडोल | साक्षीदार न्यूज | आज सकाळी तालुक्यातील वरखेडी गावात एक हृदयद्रावक घटना घडली. गावालगतच्या म्हसावद रस्त्याजवळील शेतात कामासाठी जात असताना वीज...

RECENT NEWS