Chief Minister Manoj Jarange Patil ; मुख्यमंत्री पदासाठी मनोज जरांगे पाटलांचे नावाची चर्चा !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | १९ ऑक्टोबर २०२३ | राज्याच्या राजकारणात गेल्या काही महिन्यापासून अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चेला मोठे उधाण आलं होते. देवेंद्र फडणवीस यांनीही अजित पवार यांना पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री करू असं म्हटलं होतं. पुण्यात भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनरही लागले होते. अजित पवार यांनीही राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रीपदाची संधी असूनही ही संधी गमावल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. तर आता मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्री होणार अश्या चर्चेला उधान आले आहे.

- Advertisement -

मनोज जरांगे पाटलांच वादळ आता पवारांच्या बालेकिल्ल्यात धडकणार असून या वादळाचे धक्के प्रस्थापित मराठा नेत्यांना त्यांची जागा दाखवून देईल, असा इशारा देतानाच मनोज जरांगे पाटीलच राज्याचे मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केला आहे.
पुणे जिल्हा हा पवारांचा बालेकिल्ला नाही, तर मराठ्यांचा बालेकिल्ला असल्याचं मतही मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी व्यक्त केलं. जरांगे पाटील शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर राजगुरुनगर येथे जाहीर सभेतून मराठा समाजाला संबोधित करणार आहेत.

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी राज्यभर आंदोलन सुरू असताना मनोज जरांगे पाटील यांनी थेट अजित पवार यांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या बारामतीत सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी पुणे जिल्हा पवारांचा बालेकिल्ला नसून मराठ्यांचा आहे. त्यामुळे पुढचे मुख्यमंत्री हे मनोज जरांगे पाटील असतील असं म्हणत थेट अजित पवार यांना आव्हान दिलं आहे. दरम्यान समन्वयकांनी केलेल्या या दाव्यामुळे राज्यात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

Chief Minister Manoj Jarange Patil

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Yawal News | यावलमध्ये पाण्यासाठी महिलांचा आक्रोश! ५ किमीवरून...

Yawal News यावल |  मिलिंद जंजाळे| तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, वॉर्ड क्रमांक १, दुसरखेडा रेल्वे स्टेशन परिसरात गेल्या काही वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र...

Gold Price | सोन्याच्या दरात मोठी घसरण! अजून किती...

Gold Price | साक्षीदार न्यूज | मार्च महिन्यात सोन्या आणि चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय घसरण नोंदवली गेली असून गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. Kedia...

Hindu Muslim Unity | साकळीतील ईद मिलाद सोहळ्यात हिंदू-मुस्लिम...

Hindu Muslim Unity यावल | मिलिंद जंजाळे | साकळी (बऱ्हाणपूर–अंकलेश्वर रोड) येथे मेश ऍग्रो कंपनीतर्फे आयोजित करण्यात आलेला ईद मिलाद सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात आणि...

RECENT NEWS