साक्षीदार | १६ नोव्हेबर २०२३ | राज्यात मराठा समाजाचे प्रमुख आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील आता राज्यातील अनेक जिल्ह्यात दौरे करण्यास सुरुवात केली आहे तर राज ठाकरे यांनी आज एक वक्तव्य केले होते त्यावर आता मनोज जरांगे पाटील यांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना आव्हान दिले आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले कि, माझ्या आंदोलनामागे कोण आहे हे राज ठाकरे यांनी शोधून दाखवावे, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आव्हान दिले आहे. राज ठाकरे यांनी जरांगे यांच्या आंदोलनामागे कुणीतरी असल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यांच्या या विधानाचा समाचार घेत जरांगे यांनी त्यांना हे आव्हान दिले आहे. राज ठाकरे यांनी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधला त्यात त्यांनी मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाच्या लढ्यामागे कुणीतरी असल्याचा संशय व्यक्त केला. तसेच त्यांचा मागे कोण आहे हे लवकरच समोर येईल, असे ते म्हणाले होते. त्यांची ही टीका जिव्हारी लागल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी तत्काळ त्यांना प्रत्युत्तर दिले. तसेच आपल्या मागे असणाऱ्याचा शोध घेण्याचेही आव्हान दिले. राज ठाकरे यांनी माझ्या आंदोलनामागे कोण आहे हे शोधून दाखवावे, तसेच जातीय तेढ निर्माण करण्यामागे कोण आहेत हे देखील त्यांनी शोधून काढावे, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. ते पुणे जिल्ह्यातील दौंड येथे पत्रकारांशी बोलत होते.
काय म्हणाले ठाकरे
मनोज जरांगे यांना भेटून सांगितले होते असे कोणतेच आरक्षण कधीही मिळणार नाही. मुळात त्यांच्या मागे कोण आहे, कोण बोलायला सांगत आहेत, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असे जातीय तणाव होत आहेत, हे लवकरच समोर येईल, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे. मुंबईमध्ये राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली, त्यामध्ये त्यांनी अनेक विषयावर आपली मत मांडली.सरकार अन् शरद पवार यांच्यावर त्यांनी टीकेची तोफ डागली. त्याशिवाय अजित पवार यांच्यावरही हल्लाबोल केला आहे.