साक्षीदार | ३१ ऑक्टोबर २०२३ | राज्यात मराठा समाजाचे आंदोलन अनेक जिल्ह्यात आक्रमक होत आहे तर मनोज जरांगे पाटील यांची देखील प्रकृती खालावत असल्याने अनेक समाजबांधव त्यांना गेल्या दोन दिवसापासून पाणी पिण्याची विनवणी करीत आहे तरी देखील मनोज पाटील पाणी पिण्यास नकार देत होते मात्र आज अखेर जरांगे यांनी मराठा समाजाचा मान ठेवला आहे.
सोमवारी मराठा आंदोलकांच्या विनंतीचा मान राखत मनोज जरांगे यांनी काही घोट पाणी घेतलं होतं. त्यानंतर जनतेच्या मागणीवरून मनोज जरांगे पाटील यांनी पाणी पिऊन उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आज मंगळवार थोड्याच वेळापूर्वी फोनवरून मुख्यमंत्री एकनाथ शिेंदे आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये चर्चा झाली. त्यानंत जरांगे हे थोड्या वेळात मराठा अभ्यासकांना बोलावणार आहेत आणि त्यांच्याशी चर्चा करून पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ यांच्याशी बोलणार आहेत. त्यामुळे आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काय तोडगा काढला जातो याकडे राज्यातील जनतेच्या नजरा लागल्या आहेत.