Manoj Patil Chief Minister ; मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात मनोज पाटील घेणार सभा !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | १७ नोव्हेबर २०२३ | मराठा आरक्षणासाठी आंदोलन केल्यानंतर मनोज जरंगे पाटील रुग्णालयात दाखल झाले होते. मात्र रुग्णालयातून डिस्चार्ज घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभरात दौरे व सभा घेणे सुरू केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यात मनोज जरंगे पाटील यांची सभा नियोजित आहे. सदर सभा मराठा क्रांती मोर्चाकडून होत असून सभेची जय्यत तयारी सुरु आहे. मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात सभत होत असल्याने या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर कल्याणमधील पोटे मैदानात येत्या २० नोव्हेंबरला सोमवारी जरांगे पाटील यांची सभा होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात ही पहिली सभा असल्याने मराठा क्रांती मोर्चाकडून सभेसाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली.

२० तारखेला सायंकाळी सहा वाजता कल्याण पूर्व चक्की नाका येथे जरांगे पाटील यांचं भव्य स्वागत होणार असून त्यानंतर बाईक रॅली होणार आहे. या सभेसाठी पोटे मैदानात स्टेज उभारणे, मॅट टाकणं, जमिनीचे सपाटीकरण ,एलईडी लावणे,शहरात बॅनर लावणे असे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. पाटील यांच्या सभेसाठी पोलिस यंत्रणा देखील सज्ज झाली. जरांगे पाटील यांच्या सभेच्या निमित्ताने कल्याणमधील सत्ताधारी शिवसेना शिंदे गट ,भाजपा, राष्ट्रवादी तसेच काँग्रेस, आम आदमी पार्टीमधील मराठा नेते एकत्र आल्याचे दिसून येत आहे.

Manoj Patil Chief Minister

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS