Sakshidar News – केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी पीएम किसान सन्मान योजना सुरू केली. परंतु शेतकरी या योजनेपासून अजूनही वंचित आहेत. तहसील कार्यालयात कागदपत्रांची पूर्तता करूनही अजून अनेक शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान योजनेचा हप्ता मिळत नाही. तालुक्यातील पीएम किसान योजने पासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेऊन जे कोणी शेतकरी बांधव या योजनेपासून वंचित आहेत अशा वंचित शेतकऱ्यांसाठी गावा-गावात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ई-केवायसी करावी अशी मागणी हर्षल पाटील फदाट यांनी कृषी आधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत जाफ्राबाद तालुक्यातील असंख्य खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा सन्मान निधी अजूनही मिळाला नाही. अनेक शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ मिळावा यासाठी कृषी कार्यालय ,तहसील कार्यालयात कित्येक चकरा मारल्या. मात्र कोणत्याही अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा देण्यासाठी शासनाकडून गावा-गावात शिबिर घेऊन शेतकऱ्यांच्या समस्या सोडाव्यात. शेतकऱ्यांकडून आवश्यक ती कागदपत्रे घेऊन पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ- हर्षल पाटील फदाट