Maratha community ; किनगाव येथे इंग्लिश मिडीयम निवासी स्कूल येथे २० रोजी मराठा समाजाचा वधु वर मेळावा सहभागी होण्याचे आवाहन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

यावल (प्रतिनीधी ) ; – तालुक्यातील किनगाव येथील इंग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कूल येथे बुधवार दि.२० रोजी मराठा समाजाच्या वधु वर परीचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. इंग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कुल किनगावचे चेअरमन व अंन्न आणी औषधे प्रशासन महाराष्ट्र राज्याचे सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त विजयकुमार देवचंद पाटील यांच्या संकल्पनेतून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असुन मराठा समाजा च्या तरूण व तरूणींनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन इंग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कूल व व्ही.मार्ट परीवार यांनी केले आहे .

- Advertisement -

या मेळाव्यासाठी वधू व वर यांनी आपले परीचय पत्र(बायोडाटा)व स्व लीखीत अर्जासह उपस्थीत राहावे मेळाव्यात वधू व वर यांनी व्यासपीठावर येऊन आपला संपुर्ण परीचय करून द्यावा व आपसात मेळ करण्याचा प्रयत्न करावा त्यासाठी गरज पडल्यास आयोजकही पुढाकार घेऊन संबध जुळवण्यासाठी मदत करतील हा मेळावा पुर्णपणे निशुल्क असुन दि.२० रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळात हा मेळावा घेण्यात येणार आहे या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी आपले परीचय पत्र (मोबाईल नंबरसह)व्यंकटेश बालाजी एंन्टरप्रायजेस संचलीत व्ही.मार्ट किनगाव येथे स्विकारले जातील व मेळाव्यात सोबत आणले तरी चालेल या मेळाव्यासाठी सकल मराठा समाज यावल तालुकायांचेही सहकार्य लाभणार आहे या मेळाव्या संबधीत अधीक माहीतीसाठी आपण खालील भ्रमणध्वणी क्रमांकावर संपर्क करावा डी.बी.पाटील सर यावल शहर.९४२२७७४२१५.अजय पाटील सर, सावखेडा सिम तालुका यावल.९८८१५२७९५१.सुनिल गावडे (पाटील) पत्रकार यावल शहर.९४२१५१५३९९.महेश पाटील उंटावद तालुका यावल ९८२३२३६७४३ या क्रमांकावर संपर्क करावे असे आवाहन समाज बांधवांना करण्यात येत आहे .

Maratha community

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Sand Mafia | जळगाव जिल्ह्यात अवैध वाळूच्या डंपरने घेतला...

Sand Mafia जळगांव | सुनिल भोळे | जिल्ह्यात वाळू चोरी थांबण्याचे नाव घेत नाही .साक्षीदार न्यूजने तालुका पोलीस स्टेशनचे रामकृष्ण इंगळे यांचा वाळू चोरी...

Kingaon PHC | किनगावात गरोदर मातांच्या जीवाशी खेळ; एकाच...

Kingaon PHC किनगाव | मिलिंद जंजाळे | एकीकडे सरकार 'सुरक्षित मातृत्व' आणि 'डिजिटल इंडिया'च्या गप्पा मारत असताना, जळगाव जिल्ह्यातील किनगाव येथे मात्र मानवतेला काळिमा...

Jalgaon Banana Price | केळी दरात मोठी घसरण! जळगावातील...

Jalgaon Banana Price जळगाव | मिलिंद जंजाळे | जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी सध्या गंभीर आर्थिक अडचणीत सापडले असून, बाजारात मिळणाऱ्या अत्यल्प दरामुळे नाराजी वाढत...

RECENT NEWS