Pune Crime | पत्नीच्या या भागावर पतीकडून सिगारेटचे चटके

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Pune Crime साक्षीदार न्यूज | वैवाहिक आयुष्यातील मतभेद भीषण रूप धारण करत पत्नीवर अमानुष अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. शरीरसंबंधाची मागणी केल्यानंतर पतीनेच पत्नीच्या गुप्तांगावर आणि मांडीवर पेटत्या सिगारेटने चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

- Advertisement -

29 वर्षीय पीडितेने याप्रकरणी येरवडा पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून तिच्या पतीसह सासरच्या एकूण पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

लग्नानंतरच संशयास्पद वर्तन

तक्रारदाराचा विवाह 11 एप्रिल 2025 रोजी येरवड्यातील 33 वर्षीय युवकाशी झाला. परंतु, लग्नाच्या पहिल्याच रात्रीपासून पतीचा वागणूक विचित्र होती. “खूप थकलो आहे” असे सांगून तो हनिमून नाईटला झोपी गेला. पुढील दिवसांतही तो पत्नीपासून शारीरिक संबंध टाळत राहिला. पत्नीने नैसर्गिक जवळीक साधण्याचा प्रयत्न केला असता तीला पती लैंगिकदृष्ट्या सक्षम नसल्याचे संकेत दिसले.

- Advertisement -

वैद्यकीय उपचारांचा सल्ला दिल्यावर “मी डॉक्टरांना दाखवलंय, सर्व ठीक आहे” असे सांगून त्याने उपचार घेण्यास नकार दिला. जवळीक टाळण्यासाठी तो अनेकदा घराबाहेर झोपू लागला.

सासरकडून धमक्या आणि मानसिक छळ

संपूर्ण बाबतीत सासरच्यांकडे मदत मागितल्यावर उलट “कुणालाही काही सांगू नको” असा दबाव आणण्यात आला. तिच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून मानसिक छळ वाढवल्याचेही महिलेने सांगितले. माहेरी जाण्याची इच्छा व्यक्त केली असता तिला तिथे जाण्यासही नकार देण्यात आला.

पेटत्या सिगारेटने चटके देत अमानुष अत्याचार

एका दिवशी पतीने संतापाच्या भरात “चल तुला दाखवतो” असे म्हणत तिला बेडरूममध्ये नेले आणि तिच्या खासगी अंगावर व मांडीवर सिगारेटचे चटके देत गंभीर अत्याचार केला. हा प्रकार झाल्यानंतरही सासरकडचा छळ सुरूच राहिला. नणंदांनी तिला माहेरी जाण्यापासून रोखल्याचा आरोपही तिने केला आहे.

तसेच, पतीच्या सांगण्यावरून तिने जिमसाठी 60 हजार रुपये आणून दिल्याचा उल्लेख तक्रारीत आहे.

छळाचा कळसबिंदू आणि कबुली

यानंतर पतीने तिच्याकडे चुलत सासऱ्यांना पाठवले. त्यांनीही तिच्याकडे चुकीच्या नजरेने पाहिल्याचे महिलेने म्हटले असून त्यामुळे झालेल्या गोंधळात तिला शिवीगाळ व मारहाण सहन करावी लागली.

तणावाचा कळसबिंदू गाठल्यानंतर तिने आत्महत्येची धमकी दिली. त्यानंतर दोन्ही कुटुंबांत झालेल्या बैठकीत पतीने अखेर “मी शारीरिकदृष्ट्या सक्षम नाही” अशी कबुली दिल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

पोलिसांची कारवाई

सध्या पीडिता माहेरी राहत असून तिने पतीने जाणूनबुजून विवाह करून मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप केला आहे. तिच्या तक्रारीनुसार पती, सासू, नणंद, चुलत नणंद आणि चुलत सासरे अशा एकूण पाच जणांविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

Pune Crime

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Nashirabad Police | दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह...

Nashirabad Police साक्षीदार न्यूज | नशिराबाद | गेल्या काही दिवसांपासून दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या एका अठरा वर्षीय तरुणाला जेरबंद करण्यात नशिराबाद पोलिसांना यश आले...

Yawal Police | यावल पोलिसांचा मोठा धडाका! रात्रीच्या काँबिंगमध्ये...

Yawal Police यावल | मिलिंद जंजाळे | शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी यावल पोलीस स्टेशनतर्फे दिनांक २३ मार्च रोजी रात्री उशिरापर्यंत विशेष काँबिंग ऑपरेशन...

Blood Donation Camp | वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! सारिका ताई...

Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान...

RECENT NEWS