जळगाव ; – तालुक्यातील आव्हाणे येथील राहणाऱ्या २५ वर्षीय विवाहितने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवार, ५ फेब्रुवारी दुपारी १२.३० वाजता उघडकीस आली. घराचा दरवाजा उघडाच असल्याने शेजारच्या मंडळींना विवाहितेचा मृतदेह दिसला. त्यावेळी तिच्या पतीला माहिती देत मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला. याबाबत तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मनीषा लहू मोरे (वय- २५, रा. आव्हाणे, ता. जळगाव) असे मयत विवाहितेचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मनीषा मोरे या विवाहिता आपले पती लहू मोरे व तीन वर्षीय मुलीसह जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथे वास्तव्याला होत्या. सोमवार ५ फेब्रुवारी रोजी सकाळी लहू मोरे हे कामावर निघून गेले. त्या वेळी मनीषा मोरे ह्या घरात एकटीच असताना त्यांनी राहत्या घरातील छताला गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. हा प्रकार दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास शेजारी राहणाऱ्या मंडळींना दिसून आला. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही.
त्यावेळी ग्रामस्थांनी तिचे पती लहू मोरे यांना घटनेची माहिती देण्यात आली व मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विवाहितेला मृत घोषित केले. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.