साक्षीदार | १९ नोव्हेबर २०२३ | जगभरातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष असलेल्या आज होणाऱ्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यावर लागले असून यामध्ये आता यावर देखील सट्टेबाजाराच्या अंदाजातून लक्षात येते. वर्ल्डकपच्या अंतिम लढतीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले असताना, भारत विश्वविजेता व्हावा, यासाठी देशवासीय प्रार्थना करताय. याकडे एजंट्सकडे दरांची चौकशी केली जाते आहे. दरम्यान भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांचे दर एकसारखे असल्याने सट्टा बाजारालाही अचूक अंदाज सांगणे कठीण बनले असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. सामना चुरशीचा होण्याची शक्यता वधारली असून, सामन्यातील महत्त्वाच्या टप्यांनुसार दरांमध्ये बदल केला जाणार आहे.
सट्टेबाजारात मात्र भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात काटे की टक्कर बघायला मिळत आहे. दोन्ही संघांसाठी दर एकसमान असल्याने कुठल्या संघावर डाव लावावा, असा पेच मात्र सटोरींपुढे निर्माण झालेला आहे. भारतात सट्टाबाजार अधिकृत नसला तरी छुप्या पद्धतीने कोट्यवधींचा जुगार खेळला जात असतो. विशेषतः आयपीएलसारख्या लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा असतील किंवा लोकसभा, विधानसभा निवडणुका अशा महत्त्वाच्या लढतींमध्ये सट्टा बाजाराचा कल कुठल्या दिशेने आहे, त्यावरुन निकालाचा अंदाज लावला जात असतो. वर्ल्डकप स्पर्धेसाठीदेखील सटोरी चांगलेच सक्रिय झालेले आहेत.