back to top
मंगळवार, जुलै 1, 2025

देशातील २६ एप्रिल रोजी होईल दुसऱ्या टप्प्यातील मतदान

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली ;- लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. 19 एप्रिल रोजी 102 जागांसाठी मतदान पार पडले. यानंतर आता येत्या शुक्रवारी 26 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची तयारी निवडणूक आयोगाने सुरू केली आहे.

- Advertisement -

लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात 12 राज्यांतील एकूण 88 जागांसाठी मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या मतदान प्रक्रियेत छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, आसाम, बिहार, मणिपूर, राजस्थान, त्रिपुरा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि जम्मू-काश्मीरचा समावेश आहे.

विशेष म्हणजे दुसऱ्या टप्प्यात अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य ठरणार आहे. यात राहुल गांधी, शशी थरूर, भूपेश बघेल, ओम बिर्ला, हेमा मालिनी, एचडी कुमारस्वामी, अरुण गोविल आणि प्रल्हाद जोशी असे दिग्गज उमेदवार रिंगणात आहेत. दुसऱ्या टप्प्यात केरळमधील सर्व 20 लोकसभा जागांवर मतदान होणार आहे. या 20 जागांपैकी एक जागा वायनाड आहे, जिथून काँग्रेसचे दिग्गज नेते राहुल गांधी दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. 2019 मध्ये त्यांनी 4,31,770 मतांनी निवडणूक जिंकली.

- Advertisement -

माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल छत्तीसगडच्या राजनांदगाव लोकसभा मतदारसंघातून रिंगणात आहेत. तर जेडीएस नेते आणि माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी कर्नाटकच्या मंड्या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात आहेत. या जागेवर काँग्रेसचे व्यंकटरमण गौडा त्यांना आव्हान देणार आहेत.

केरळमधील तिरुअनंतपुरम ही जागा दुसऱ्या टप्प्यातील सर्वात हायप्रोफाईल जागांपैकी एक आहे. येथे एका बाजूला भाजपकडून केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर निवडणूक रिंगणात आहेत तर दुसरीकडे काँग्रेसकडून माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर लढत आहेत. अभिनेत्री हेमा मालिनी उत्तर प्रदेशच्या मथुरा लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. तर प्रभू श्रीरामाची भूमिका साकारणारे अभिनेता अरुण गोविल यूपी मेरठ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात आहेत. दरम्यान, 12 राज्यांतील 88 जागांवर 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

 

छत्तीसगड: महासमुंद, कांकेर, राजनांदगावकर्नाटक: शिमोगा, चिक्कोडी, बेळगाव, बागलकोट, विजापूर, गुलबर्गा, रायचूर, बिदर, कोप्पल, बेल्लारी, हावेरी, धारवाड, उत्तरा कन्नड, दावणगेरे,महाराष्ट्र: बुलढाणा, अकोला, यवतमाळ वाशीम, हिंगोली, नांदेड, परभणी, अमरावती, वर्धामणिपूर: बाह्य मणिपूर
केरळ: अलाप्पुझा, मावेलिक्कारा, पठाणमथिट्टा, कोल्लम, अटिंगल, तिरुवनंतपुरम, कासारगोड, कन्नूर, वडकारा, वायनाड, कोझिकोड, मलप्पुरम, पोन्नानी, पलक्कड, अलाथूर, थ्रिसूर, चालकुडी, एर्नाकुलम, कोट्टाकी, कोट्टाकी.
आसाम: करीमगंज, सिलचर, मंगलदोई, नागाव आणि कालियाबोर
बिहार: किशनगंज, कटिहार, पूर्णिया आणि भागलपूर
मध्य प्रदेश: दमोह, खजुराहो, सतना, टिकमगड, रेवा, होशंगाबाद
राजस्थान: बारमेर, जालोर, उदयपूर, बांसवाडा, चित्तोडगड, टोंक-सवाई माधोपूर, अजमेर, पाली, जोधपूर, राजसमंद, भीलवाडा, कोटा आणि झालावाड-बरन.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Insurance Yojana | बँक खात्यात पैसे नाही , तरीही...

Insurance Yojana | साक्षीदार न्यूज  | सरकारने गरीब आणि गरजू नागरिकांसाठी सुरू केलेली प्रधानमंत्री जनधन योजना (PMJDY) ही एक क्रांतिकारी योजना आहे, जी बँक...

Indian Railways | भारतीय रेल्वेत मोठे बदल: तात्काळ तिकीट,...

Indian Railways साक्षीदार न्यूज | उद्या, १ जुलै २०२५ पासून भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सेवेत सुधारणा करण्यासाठी काही महत्त्वपूर्ण बदल लागू करणार आहे....

Bjp T Raja Resignation | तेलंगणात भाजपला मोठा धक्का:...

Bjp T Raja Resignation साक्षीदार न्यूज | तेलंगणातील भाजपला मोठा झटका बसला आहे. पक्षाचे कट्टर नेते आणि गोशामहलचे आमदार टी राजा यांनी अचानक पक्षाच्या...

RECENT NEWS