साक्षीदार | ९ नोव्हेबर २०२३ | मुंबईतील प्रवाशांना नेहमीच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहचविण्यासाठी लोकल सेवा मोठ्या प्रमाणात सुरु आहे, मात्र याच लोकलवर एका माथेफिरूने दगडफेक केलायची घटना ठाकुर्ली- डोंबिवली रेल्वे स्थानकादरम्यान घडली आहे. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या टिटवाळा एसी लोकलवर रेल्वे रुळालगत आज सकाळी नऊ वाजेच्या हि दगडफेक झाली आहे.
अनेकदा धावत्या रेल्वेवर दगडफेक झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. यात प्रवाशी जखमी देखील झाले आहेत. तर आज मुंबईच्या दिशेने जात असलेल्या एसी लोकल ट्रेनवर देखील एकाने दगडफेक केल्याची घटना घडली. या दगडफेकीत सुदैवाने कोणी प्रवाशी जखमी झाला नाही. मात्र या घटनेने रेल्वेतील प्रवाशी भयभीत झाले होते.
दगडफेकीत लोकलच्या खिडकीची काच फुटली असून सुदैवाने या दगडफेकीत कुणी प्रवासी जखमी झाले नाही. याबाबत प्रवाशांनी रेल्वेला तक्रार केल्यानंतर रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. याच परिसरातुन एका संशयित माथेफिरूला रेल्वे सुरक्षा बलाने ताब्यात घेतले. त्याची चौकशी सुरू आहे. त्याने दगडफेक का केली हे चौकशीअंती स्पष्ट होणार आहे.








