साक्षीदार न्युज । जळगांव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ ला.ना.सा.विद्यालयात गणित विषयाची भिती कमी होऊन गणित शैक्षणिक साहित्याचा उपयोग करून मनोरंजक पद्धतीने गणित विषयातील विविध संकल्पना स्पष्ट व्हाव्यात या हेतूने दिनांक 2 ते 7 जानेवारी दरम्यान गणित शैक्षणिक साहित्य, गणितीय रांगोळी, तक्ते ,हस्तलिखिते प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
या प्रदर्शनात 250 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन गणितातील विविध संकल्पना,मूलभूत क्रिया,संबोध स्पष्टीकरण समजण्यासाठी सृजनात्मक पद्धतीने विविध गणितीय प्रतिकृती,कलात्मक रांगोळी सादर करून दर्शकांची मने जिंकली.या प्रसंगी इयत्ता 8 वी अ मधील विद्यार्थी प्रसाद शेखर जैन याने सुप्रसिद्ध गणितज्ञ श्री.रामानुजन यांची वेशभूषा साकारून त्यांच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला.या प्रदर्शनातील विशेष बाब म्हणजे गणितीय झाडाची प्रतिकृती की ज्यामध्ये गणिताच्या विविध शाखांची आकर्षक रचना केली होती.या प्रदर्शनाला शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय पदाधिकारी तसेच जळगाव शहरातील प.न. लुंकड कन्या शाळा, आर.आर.विद्यालय, सु.ग.देवकर प्राथ.शाळा,आ.वा.अत्रे स्कूल,विविध शाळांचे विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक असे जवळपास 3000 जणांनी भेट देऊन सहभागी विद्यार्थी,मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन करून चांगल्या प्रतिक्रिया नोंदविली.हा अभिनव उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकल्प प्रमुख सौ. सुवर्णा वंजारी उपप्रमुख श्री.पंकज खंडाळे तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री सचिन देशपांडे, उपमुख्याध्यापक श्री संजय भारुळे,पर्यवेक्षक श्री प्रशांत जगताप,श्री.संजय वानखेडे,सौ.सविता दातार,सौ.स्मिता करे,सौ.जयश्री नेहेते,श्री.सोमनाथ महाजन,श्री.मिलिंद देशपांडे, श्री.नितीन कोष्टी,श्री.आनंद पाटील,श्री.पंकज महाले,श्री.प्रेमराज सारस्वत श्री.हेमंत सपकाळे,श्री.श्रीकांत घुगे,श्री.हितेंद्र जोशी, सौ.कविता कुऱ्हाडे,सौ.रेखा पाटील,सौ.रुपाली महाजन,सौ.संगीता कुलकर्णी,सौ.नीलिमा सपकाळे, आदींचे उत्तम सहकार्य व मार्गदर्शन मिळाले.