आई भवानीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी – जयश्रीताई महाजन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

जळगाव (सुनील भोळे ) : – जळगाव विधानसभा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अधिकृत उमेदवार जयश्री सुनिल महाजन यांनी आज (दि.६) पिंप्राळा येथील भवानी मातेचे दर्शन घेऊन प्रचाराची सुरुवात केली. यावेळी महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकाऱ्यांसह त्यांच्या समर्थकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.

- Advertisement -

Mother Bhavani

याप्रसंगी जयश्रीताई महाजन यांनी मतदारांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्या म्हणाल्या, ‘आई भवानी आपल्या पाठीशी आहे, तिचा आशीर्वाद आणि मतदारांची साथ याने आपण जळगाव शहरात परिवर्तनाची लाट आणत शहराच्या प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरु करु. सद्यस्थितीत जळगावकर त्रासला आहे रस्त्यांना, महामार्गावर होणाऱ्या अपघातांना तसेच महत्वाच्या चौकात होणाऱ्या वाहन कोंडीला. शहराचा विकास करायचा म्हणजे नुसते रस्ते, गटारी बांधून होत नाही तर सर्वसामान्य माणसाचे उत्पन्न वाढण्यासोबत, औद्योगिक विकास होवून आपल्या शहरातील तरुणांना इथेच रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. माझे विकासाचे व्हिजन मी आपल्यासमोर लवकरच मांडणार आहे. तुमच्या आशिर्वादाने व उत्स्फूर्त पाठिंब्याने माझा नव्हे तर आपला सर्व जळगावकरांचा विजय निश्चित आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या वक्तव्यामुळे आणि मांडलेल्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा आणि उत्साह तसेच उपस्थितांमध्ये नवीन उर्मी दिसून आली.

- Advertisement -

Mother Bhavani

जयश्रीताई महाजन यांनी आज प्रभाग क्रमांक १० च्या परिसरातील सेंट्रल बँक कॉलनी, आनंद मंगल कॉलनी, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पिंप्राळा गावठाण, मयूर कॉलनी, गणपती नगर, कुंभारवाडा, माऊली नगर या परिसरात प्रचार रॅलीदरम्यान परिसरातील थोरामोठ्यांचे आशीर्वाद घेत, आपल्या मशाल चिन्हाला भरघोस मतांनी विजयी करण्यासाठी जनतेला आवाहन केले. संत मीराबाई नगर येथे प्रचार रॅलीचा समारोप झाला.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS