back to top
गुरूवार, ऑगस्ट 21, 2025

MD Drugs Jalgaon; जळगांवात पकडले MD ड्रग्ज, तरुणाला अटक !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव ; – महाराष्टरात गाजलेल्या ड्रग्ज प्रकरण याचे धागेदोरे हे जळगांव जिल्ह्यात पसरलेले आहे हे वर्तविले जात होते ,मात्र शहरातील शाहूनगर मधील शाहू कॉम्प्लेक्स परिसरात रस्त्यावर एमडी अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या एका संशयीताला शहर पोलिसांनी कारवाई करत ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी ही कारवाई रविवारी ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ७. ३० वाजेला केली होती .५०० रुपये किमतीचे एमडी अमली पदार्थ त्याच्याकडून हस्तगत करण्यात आले आहे . याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत सविस्तर वृत्त असेकी, जळगाव शहरातील शाहू नगरातील शाहू कॉम्प्लेक्स परिसरात एक तरुण हा एमडी या अंमली पदार्थाचे सेवन करत असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने रविवारी ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता छापा टाकून संशयित आरोपी शाहरुख सिराज भिस्ती (वय-२८) रा. शाहूनगर जळगाव याला ताब्यात घेतले. त्याच्या झाडाझडती घेतली असता त्याच्याजवळ ५०० रुपये किमतीचे ५ ग्रॅम एमडी अंमली पदार्थ आढळून आले. ते पोलिसांनी हस्तगत केले. दरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी विभागाचे पोलीस कॉन्स्टेबल सचिन साळुंखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी शाहरुख शिराज भिस्ती याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलीस या घटनेचा पूर्ण तपस करतील काय ?
भिस्ती जर हा स्वतःसाठी वापरात असेल तर जळगांव शहरात अजून असे किती युवक ड्रग्जच्या जाळ्यात अडकलेले आहेत याचाही तपास होणे गरजेचे आहे . भिस्ती जर स्वतः सेवन करतो तर मग त्याला लागणारा हा MD ड्रग्ज आणतो तरी कुठून असे अनेक प्रश्न निर्माण होत आहे . जळगांव शहरात एखादे मोठे रॅकेट यात काम करत असेल अशी शक्यता नाकारता येत नाही . पोलिसांनी या संपूर्ण घटनेच्या पायामुळा पर्यंत पोहचले पाहिजे अशी आशा नागरिकांकडून वर्तविली जात आहे .

- Advertisement -

ही कारवाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस विभागातील पोलीस कॉन्स्टेबल सचिन साळुंखे, शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय निकुंभ, भास्कर ठाकरे, अमोल ठाकूर, रतन गीते यांनी केली आहे. पोलीस या घटनेच्या खोलवर जातील काय असा सवाल नागरिकांच्या मनात निर्माण होत आहे .जळगांव शहराची तरुण पिढी यात अडकण्याची भीती देखील वर्तविली जात आहे . पोलिसांनी या MD ड्रग्ज प्रकारांची पायेमुळे शोधून काढावी अशी आशा सामान्य नागरिकांकडून वर्तविली जात आहे .

MD Drugs Jalgaon

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Big News Ration Card | केंद्राचा मोठा निर्णय: 1.17...

Big News Ration Card | साक्षीदार न्यूज  | केंद्र सरकारने राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कायद्यांतर्गत (NFSA) स्वस्त धान्य योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे 1.17 कोटी रेशनकार्डधारकांना...

Domestic Violence | यावल येथे कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार; पाच...

Domestic Violence | साक्षीदार न्यूज | यावल येथील पोलीस ठाण्यात एका महिलेने आपले पती, सासू, जेठ, जेठाणी आणि नणंद यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठी...

Electric shock | वरखेडी गावात करंट लागल्याने पाच जणांचा...

Electric shock एरंडोल | साक्षीदार न्यूज | आज सकाळी तालुक्यातील वरखेडी गावात एक हृदयद्रावक घटना घडली. गावालगतच्या म्हसावद रस्त्याजवळील शेतात कामासाठी जात असताना वीज...

RECENT NEWS