साक्षीदार | २७ ऑक्टोबर २०२३ | राज्यातील वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे दि.२६ रोजी निधन झाल्याने राज्यभरातील भाविकांवर शोककळा पसरली आहे. तर आज शुक्रवारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाबा महाराज सातारकरांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. त्यानंतर कुटुंबियांचे सांत्वन केले.
फडणवीस म्हणाले सातारकर कुटुंबाची खूप मोठी परंपरा वारकरी संप्रदायात राहिली आहे. त्यांची चाैथी पिढी अध्यात्मच्या कार्यात आपल्याला पाहायला मिळत आहे. बाबामहाराज सातारकर यांनी अध्यात्मात नवीन बदल घडवल्याने नवीन प्रवचनकार, कीर्तनकार तयार झाले. फडणवीस पूढे म्हणाले त्यांच्या वाणीत गोडवा होता. सामान्य माणसाला त्यांचे विचार पटेल असे त्याचे प्रवचन होते. जनमानसात त्यांची वेगळी प्रतिमा आहे. त्यांच्या स्मारकबाबत मी कुटुंबीयांशी चर्चा केली असून, त्यांच्या विचाराचे स्मारक व्हायला हवे यासाठी प्रयत्न करू असेही फडणवीस यांनी बाेलताना नमूद केले.