साक्षीदार | २५ नोव्हेबर २०२३ | देशातील राजस्थान राज्यात विधानसभा निवडणुकीचा धुमाकूळ सुरु असतांना याच उमेदवारीच्या एका होर्दिगमुळे राज्याचे राजकारण तापले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हिंदूहृदयसम्राट असा उल्लेख करण्यात आला असल्याने ठाकरे गटाने एकनाथ शिंदेंवर सडकून टीका केली होती. उद्धव ठाकरे यांनी देखील यावर भाष्य केलं आहे.
ठाणे आणि पालघर येथील भाजप, राष्ट्रवादी तसेच आम आदमी पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांनी संबोधित केले. ठाण्याच्या भाजपच्या महिला पदाधिकरी ज्योता पाटील आणि बिपिन गेहलोत, आम आदमी पार्टीचे प्रवक्ते आणि कामगार नेते संजय बापेरकर तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष (दादरा नगर हवेली) हरिश्चंद्र कुलात यांनी आज शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला.हिंदूहृदयसम्राट देशात नव्हे तर जगात देखील एकच आहेत. हिंदूहृदयसम्राट म्हणजे बाळासाहेब ठाकरे हे एकच आहेत. मात्र ही उपाधी देखील काहीजण चोरण्याचा प्रयत्न करत आहेत. राजकारणातील या गद्दारांना गाडायला वेळ लागणार नाही. खरे शिवसैनिक या गद्दारांना गाडण्यासाठी परत येत आहेत, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे.